IND vs SL U19 Asia Cup : टीम इंडिया सेमी फायनलसाठी सज्ज, श्रीलंकेविरुद्ध भिडणार, सामना किती वाजता?
U19 Asia Cup IND vs SL Semi Final Live Streaming : अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत कोण पोहचणार हे? शुक्रवारी 19 डिसेंबरला निश्चित होणार आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात अंतिम फेरीसाठी चुरस असणार आहे.

अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील (Under 19 Asia Cup 2025) साखळी फेरीतील सामने पूर्ण झाले आहेत. आता एकूण 4 संघांमध्ये अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीत टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या 4 संघांनी धडक दिली आहे. तर उपांत्य फेरीतील 2 सामने एकाच दिवशी होणार आहेत. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. या सामन्यातही आयुष म्हात्रे भारताचं नेतृत्व करणार आहे. तर विमथ दिनसरा याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबादारी आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल? जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका अंडर 19 सेमी फायनल मॅच कधी?
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका अंडर 19 सेमी फायनल मॅच शुक्रवारी 19 डिसेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका अंडर 19 सेमी फायनल मॅच कुठे?
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका अंडर 19 सेमी फायनल मॅचचं आयोजन हे दुबईतील आयसीसी अकादमी ग्राउंडवर करण्यात आलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका अंडर 19 सेमी फायनल मॅचला भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होईल?
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका अंडर 19 सेमी फायनल मॅचला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 10 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका अंडर 19 सेमी फायनल मॅच टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका अंडर 19 सेमी फायनल मॅच टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका अंडर 19 सेमी फायनल मॅच मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका अंडर 19 सेमी फायनल मॅच मोबाईलवरुन सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेच्या कामगिरीकडे लक्ष
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे टीम इंडियाच्या या स्टार जोडीच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. वैभवने या स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली आहे. वैभवने धावा करण्याचा सपाट या स्पर्धेतही कायम ठेवला आहे. त्यामुळे वैभवकडून उपांत्य फेरीत मोठ्या खेळीची आशा आहे. तसेच आयुषनेही वैभवला चांगली साथ देत शतक ठोकावं, अशी आशा चाहत्यांना आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. या सामन्यालाही भारतीय वेळेनुसार सकाळी साडे दहा वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात कोणते 2 संघ पोहचणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा लागून राहिली आहे.
