INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
आधुनिक भारतातील आधुनिक महिलांची गरज ओळखून त्यांना आरामदायी वाटेल अशा शैलीत ही वस्त्रं तयार करण्यात आली आहेत. फ्लोरेट कंपनीने सॉफ्ट टच फॅब्रिक्स, डिझाईनला प्राधान्य देऊन आपली उत्पादने तयार केली आहेत.
मुंबईच्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये 17 ते 19 डिसेंबर 2025 या काळात बहुचर्चित अशा INTIMASIA 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्झिबिशनमध्ये अनेक वस्त्रनिर्मिती कंपन्यांनी आपली उत्पादने प्रदर्शन तसेच विक्रीसाठी ठेवली आहेत. पण यावेळी फ्लोरेट कंपनीच्या उत्पादनांची विशेष चर्चा होत आहे. यावेळी फ्लोरेटने आपली नवीकोरी उत्पादने प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. विशेष म्हणजे आधुनिक भारतातील आधुनिक महिलांची गरज ओळखून त्यांना आरामदायी वाटेल अशा शैलीत ही वस्त्रं तयार करण्यात आली आहेत. फ्लोरेट कंपनीने सॉफ्ट टच फॅब्रिक्स, डिझाईनला प्राधान्य देऊन आपली उत्पादने तयार केली आहेत.
फ्लोरेटच्या प्रदर्शनामध्ये दैनंदिन जीवनात आरामदायी वाटेल अशा प्रीमियम फॅब्रिक्स असलेल्या नव्या डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच भारतातील जलवायू, जीवनैशील याचाही विचार करून तयार करण्यात आलेली उत्पादने यावेळी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील.

