IND vs SA : अहमदाबादमधील खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? जाणून घ्या पीच रिपोर्ट
IND vs SA 5th T20I Match Pitch Report : अहमदाबादमध्ये होणारा पाचवा आणि अंतिम टी 20I सामना मालिकेच्या दृष्टीने भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे.जाणून घ्या ही खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार?

IND vs SA 5th T20I Match Pitch ReportImage Credit source: PTI
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20I सामना हा शुक्रवारी 19 डिसेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. मालिकेतील चौथा सामना धुक्यांमुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे मालिका रंगतदार स्थितीत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला पाचवा आणि अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर ही मालिका 2-2 ने बरोबरीचत सोडवण्याचं आव्हान आहे. अशात नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी कुणासाठी अनुकूल ठरणार? हे पीच रिपोर्ट्द्वारे जाणून घेऊयात.
