IND vs SA: पाचवा सामनाही धुक्यांमुळे रद्द होणार? अहमदाबादमध्ये कसं असेल हवामान?
IND vs SA 5th T20I Ahmedabad T20I Weather Report : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना हा धुक्यांमुळे रद्द झाला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून पाचवा सामनाही धुक्यांमुळे रद्द होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जाणून घ्या अहमदाबादमध्ये हवामान कसं असेल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20I सामन्याचं आयोजन हे बुधवारी 17 डिसेंबरला लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. हा सामना तब्बल 6 वेळा पाहणी केल्यानंतर टॉसविना रद्द करण्यात आला. लखनौतील धुक्यांमुळे हा सामना होऊ शकला नाही. धुक्यांमुळे दृष्यमानता कमी होते. त्यामुळे फिल्डिंग करताना खेळाडूंना समस्या उद्भवते. त्यामुळे पंचांकडून ठराविक अंतराने दृष्यमानता योग्य आहे की नाही? याची पाहणी करण्यात आली. मात्र अखेरपर्यंत धुक्यांमुळे दृष्यमानता सामना होण्यासाठी पूरक नव्हती. त्यामुळे हा सामना नाईलाजाने रद्द करावा लागला. त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. चाहत्यांनी बीसीसीआयवर संताप व्यक्त केला.
आता टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा 19 डिसेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात अहमदाबादमध्ये हवामान कसं असेल? हे आपण जाणून घेऊयात.
