AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA T20I : पाचवा-निर्णायक सामना अहमदाबादमध्ये, किती वाजता सुरुवात होणार?

India vs South Africa 5th t20i Live Streaming : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ टी 20I वर्ल्ड कपआधी शेवटचा सामना खेळणार आहेत. हा सामना किती वाजता सुरु होणार? जाणून घ्या.

IND vs SA T20I : पाचवा-निर्णायक सामना अहमदाबादमध्ये, किती वाजता सुरुवात होणार?
Arshdeep Singh IND vs SA T20iImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 19, 2025 | 12:20 AM
Share

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची टी 20i मालिका अंतिम टप्प्यात आहे. टीम इंडिया या मालिकेत 4 सामन्यानंतर 2-1 ने आघाडीवर आहे. उभयसंघातील चौथा आणि निर्णायक सामन्याचं आयोजन हे लखनौतील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र या सामन्यात टॉसही झाला नाही. धुक्यांमुळे हा सामना रद्द करावा लागला. त्याआधी टीम इंडियाने पहिला आणि तिसरा सामना जिंकला. तर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात भारतावर मात करुन विजयी खातं उघडलं होतं. त्यामुळे आता मालिकेचा निकाल काय लागतो? हे पाचव्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. हा पाचवा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना शुक्रवारी 19 डिसेंबरला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचव्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचव्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना मोबाईलवर जिओस्टार एपवर पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी या वेबसाईटवर सामन्याबाबत लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

अक्षरनंतर शुबमन गिल आऊट

टीम इंडियाला या मालिकेदरम्यान 2 मोठे झटके लागले. टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर अक्षर पटेल याला आजारामुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे.  तर त्यानंतर शुबमन गिल दुखापतीमुळे चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे शुबमनच्या जागी संजू सॅमसन याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याचं निश्चित आहे. अशात आता संजूला आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी मोठी खेळी करण्याची संधी आहे. एकूणच टीम इंडिया या सामन्यात कसा गेम करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी