AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket : कसोटी क्रिकेटचा नियम बदलला, आता विकेट पडल्यानंतर…

कसोटी क्रिकेटचा पुन्हा एकदा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे कसोटी क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. आता कसोटी क्रिकेटमधील नियम बदलला आहे. तसेच बॅटबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. चला जाणून घेऊयात एमसीसीने काय बदललं ते...

Test Cricket : कसोटी क्रिकेटचा नियम बदलला, आता विकेट पडल्यानंतर...
Test Cricket : कसोटी क्रिकेटचे नियम बदलले, आता विकेट पडल्यानंतर...Image Credit source: PTI
| Updated on: Feb 03, 2026 | 8:18 PM
Share

टी20 क्रिकेटचा उदय झाल्यापासून कसोटी क्रिकेट कंटाळवाणं वाटत होतं. क्रीडाप्रेमींनी त्याकडे पाठ फिरवली होती. पण पुन्हा एकदा कसोटी चांगले दिवस आले आहेत. कसोटी क्रिकेट पाहण्याची रंगत नव्या नियमामुळे वाढली आहे. इतकंच काय तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. असं असताना क्रिकेट नियमाची अंमलबजावणी करणाऱ्या मेलबर्न क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीने कसोटी क्रिकेटच्या नियमात काही बदल केले आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेट सामने आणखी रोमांचक होणार आहेत. त्याला कारणही तसंच आहे. नव्या कसोटी क्रिकेट नियमानुसार, कसोटी क्रिकेट सामन्यात दिवसाच्या शेवटी विकेट पडली तर खेळ तिथेच थांबवला जात होता. पण आता तसं होणार नाही. या नियमात बदल केला जाणार आहे. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाचं टेन्शन वाढणार आहे. तसेच गोलंदाजी करणाऱ्या संघाला मदत होणार आहे.

कसोटी क्रिकेटच्या नियमात मोठा बदल

मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नियम 12.5.2 च्या मते, कसोटी क्रिकेटच्या शेवटच्या दिवशी विकेट पडली की आता खेळ बंद होणार नाही. यापूर्वी विकेट जर षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पडली तर सामना तिथेच थांबवला जायचा. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा व्हायचा. दुसऱ्या दिवशी ठरवलेल्या रणनितीनुसार फलंदाज फलंदाजीला उतरत होता. पण आता तसं होणार नाही. एसीसीच्या नियमानुसार, शेवटच्या षटकात विकेट पडली तरी त्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेळला जाईल. यामुळे क्षेत्ररक्षण करणारा संघ सामन्यावर पकड मजबूत करण्यास सक्षम राहील. तसेच प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्यास मदत होईल.

महिला क्रिकेट चेंडूत बदल

एमसीसीच्या नव्या नियमानुसार, महिला क्रिकेट आणि ज्यूनिअर क्रिकेट (अंडर 13) मध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूत बदल होणार आहे. आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूचं वजन हे 140 ते 151 ग्रॅम दरम्यान होतं. तर त्याचा आकार 21 ते 22.6 सेमी होता. पण आता नव्या नियमानुसार चेंडूचं वज हे 140 ते 149 ग्रॅम असेल. तर त्याचा आकारमान हा 21.5 ते 22 सेमी असेल. ज्युनिअर क्रिकेटमध्ये (अंडर 13) चेंडूचं वजन 133 ते 144 ग्रॅम आणि आकारमान 20.5 ते 22 सेमी होतं. पण या नियमात बदल केला आहे. आता वजन 140 ते 144 ग्रॅम असेल आणि आकारमान 20.5 ते 21 सेमी असेल.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...