AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली आणि गुजरातचं मिशन ‘फायनल’, एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघांचा सारखाच निर्णय, नक्की काय?

Gujarat Giants Women vs Delhi Capitals Women Eliminator : गुजराज जायंट्सने दिल्लीला चौथ्या मोसमातील दोन्ही सामन्यात पराभूत केलंय. त्यामुळे दिल्लीकडे एलिमिनेटर सामन्यात या दोन्ही पराभवांची परतफेड करण्याची संधी आहे.

दिल्ली आणि गुजरातचं मिशन 'फायनल', एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघांचा सारखाच निर्णय, नक्की काय?
दिल्ली आणि गुजरातचं मिशन 'फायनल', एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघांचा सारखाच निर्णय, नक्की काय?Image Credit source: WPL X Account
| Updated on: Feb 03, 2026 | 7:49 PM
Share

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील (WPL 2026) एलिमिनेटर सामन्यात गतउपविजेता दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात जायंट्स आमनेसामने आहेत. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी या 2 संघांमध्ये चुरस आहे. हा सामना जिंकणारा संघ ट्रॉफीसाठी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना आर या पार असा आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन जेमिमाह रॉड्रिग्स हीने फिल्डिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. अशात आता दिल्लीचे गोलंदाज आपल्या कॅप्टनचा फिल्डिंगचा निर्णय योग्य ठरवण्यात यशस्वी होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघांचा सारखाच निर्णय

दिल्ली आणि गुजरात या दोन्ही संघांनी एलिमिनेटर सामन्यासाठी सारखाच निर्णय घेतला आहे. दोघांनीही प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही संघांनी आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.

गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन : सोफी डिव्हाईन, अनुष्का शर्मा, एश्ले गार्डनर(कर्णधार), जॉर्जिया वेरेहम, बेथ मुनी(विकेटकीपर), भारती फुलमाळी, कनिका आहुजा, कशवी गौतम, तनुजा कंवर, रेणुका सिंग ठाकूर आणि राजेश्वरी गायकवाड.

दिल्ली कॅपिटल्स वुमन्स प्लेइंग इलेव्हन : शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, लिझेल ली (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), मारिझान काप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी आणि नंदनी शर्मा.

गुजरात आणि दिल्लीची साखळी फेरीतील कामगिरी

गुजरातने दिल्लीच्या तुलनेत साखळी फेरीत चांगली कामगिरी केलीय. गुजरातने साखळी फेरीतील 8 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला. तर दिल्लीला 8 पैकी 4 सामन्यांतच प्रतिस्पर्धी संघावर मात करता आली. विशेष म्हणजे गुजरातने साखळी फेरीत दोन्ही वेळा दिल्लीचा 4 आणि 3 अशा फरकाने धुव्वा उडवला. त्यामुळे गुजरातचा आता दिल्ली विरुद्ध सलग तिसरा विजय मिळवून अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीचा गेल्या 2 सामन्यांतील पराभवाची परतफेड करुन अंतिम फेरीत पोहचण्याची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. दिल्लीने याआधीच्या तिन्ही हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...