AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...

शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग…

| Updated on: Aug 13, 2026 | 5:25 PM
Share

शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाला राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार २९अ नुसार नाही, तसेच उच्च न्यायालयही असे आदेश देऊ शकत नाही

शिवसेना पक्षाच्या चिन्हावरून सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचे मुद्दे मांडले. निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक आयोगाला २९अ नुसार कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार नाही. नोंदणी रद्द करणे हा एक प्रशासकीय निर्णय असून, तो न्यायिक पातळीवर येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

एवढेच नाही, तर उच्च न्यायालयही निवडणूक आयोगाला पक्षाची नोंदणी रद्द करण्याचे आदेश देऊ शकत नाही, असे सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान सांगितले. पक्षाच्या अंतर्गत रचनेत, म्हणजेच पक्षप्रमुख आणि कार्यकारिणी कोण असेल, हे ठरवण्याचा अधिकार पक्षालाच असतो. निवडणूक आयोगाने पक्षाने दिलेल्या माहितीनुसारच नोंदणी करावी. २०१८ मध्ये शिवसेनेच्या घटनेत झालेले बदल आयोगाने मान्य केले होते, आणि एकनाथ शिंदे यांनी त्याच घटनेनुसार गटनेतेपद स्वीकारले होते, याचा लाभही घेतला होता, यावर सिब्बल यांनी भर दिला. आयोगाने विधिमंडळातील संख्याबळावर आधारित निर्णय घेतल्याने, त्यांची पद्धत अलोकतांत्रिक ठरते, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

Published on: Aug 13, 2026 05:25 PM

Follow Us