ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जखमी वाघाचा मृत्यू; महिनाभरापासून मानेवर होत्या जखमा; रानतळोधीत आढळला मृतदेह

| Updated on: Mar 30, 2022 | 8:43 PM

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मृत झालेला वाघ काही दिवसापूर्वी कॅमेराट्रॅप झाला होता. त्यावेळी त्याच्या हालचाली दिसून आल्या होत्या. वाघ ज्यावेळी कॅमेराट्रॅप झाला, त्यावेळी बारकाव्याने त्याचे निरीक्षण करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या शरीराला आणि मानेला जखमा असल्याचे दिसून आले होते. 

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जखमी वाघाचा मृत्यू; महिनाभरापासून मानेवर होत्या जखमा; रानतळोधीत आढळला मृतदेह
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मृत वाघ आढळून आला.
Image Credit source: TV9
Follow us on

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (Tadoba Tiger Project) आज वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. व्याघ्र प्रकल्पात मृत झालेला वाघ (Death Tiger) हा नर असून वय साडेचार वर्ष असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. ताडोबाच्या आंबेउतारा नियतक्षेत्रातील रानतळोधी (Ambeutara Rantalodhi) येथे या मृत वाघाचा मृतदेह आढळून आला होता. वाघाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृत वाघाचा मृतदेह चंद्रपुरला पाठवण्यात आला. गेल्या फेब्रुवारी महिन्यात हा वाघ कॅमेराट्रॅप झाला होता. त्यावेळी तो जखमी असल्याचे आढळून आले होते. व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि इतर प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतात.  मात्र तोडाबाच्या घनदाट जंगलामुळे प्राण्यांवर उपचार करताना वन विभागाला अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे जखमी प्राण्यांवर उपचार करताना त्यांच्यावर मर्यादा जाणवत असतात.

वाघाच्या मानेभोवती जखमा

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मृत झालेला वाघ काही दिवसापूर्वी कॅमेराट्रॅप झाला होता. त्यावेळी त्याच्या हालचाली दिसून आल्या होत्या. वाघ ज्यावेळी कॅमेराट्रॅप झाला, त्यावेळी बारकाव्याने त्याचे निरीक्षण करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या शरीराला आणि मानेला जखमा असल्याचे दिसून आले होते.

प्राण्यांवर उपचार करताना अडचणी

जंगलातील वाघ किंवा इतर प्राणी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जखमी होणे, शरीराला हानी पोहचणे अशा घटना घडत असल्यातरी त्यानंतर मात्र प्राण्यांवर उपचार करताना ताडोबातील घनदाट जंगलामुळे वन विभागाला नेहमीच अडचणी येत असतात. जखमी प्राण्यांवर वेळीच त्यांच्यावर उपचार केले गेले नाहीत तर त्यांचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता असते.

वातावरणातही बदल

व्याघ्र प्रकल्पात काही प्राणी असले आणि त्यांचा वावर असला तरी त्यांच्या काही समस्या जाणवत असतील त्यांच्यावर उपचार करणे खूप अवघड झाले आहे. या परिसरातील जो जंगल परिसर आहे, तो घनदाट असल्याने वन विभागाला जखमी प्राण्यांवर उपचार करताना समस्या जाणवत असतात. त्यामुळे जखमी प्राण्यांची समस्या सोडवणेही जिकरीचे काम झाले आहे. सध्या वातावरणात प्रचंड बदल होत आहे. वातावरणातील तापमानात वाढ होत असून त्याचा परिणामही प्राण्यावर होत आहे.

रानतळोधीत पाण्यात आढळला मृत वाघ

ताडोबाच्या आंबेउतारा नियतक्षेत्रातील रानतळोधी येथे या मृत वाघाचा मृतदेह आढळून आला होता. आढळून आलेला मृत वाघ हा फेब्रुवारी महिन्यात दिसला होता. मात्र त्यावेळी त्याच्या मानेला जखमा असल्याचे आढळून आले होते. मात्र त्या जखमा कशामुळे झाल्या होत्या, आणि केव्हा झाल्या होत्या हे मात्र कळून आले नाही.

घनदाट जंगलामुळे मर्यादा

वाघांच्या संरक्षणासाठी वन विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात असले तरी काही वेळा येथील घनदाट जंगालामुळे वन विभागावरही मर्यादा जाणवत असतात. जंगलात आढळून आलेला वाघाचा मृतदेह चंद्रपूर येथे पाठवून देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Akola Water Crisis : नुसतीच बडी बडी नावं, 40 वर्षांपासून पाणी नाही, अकोल्यात महिलांचा एल्गार

Chandrapur Temp. : देशातल्या तिसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात का? 5 कारणे

शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी? Chandrasekhar Bavankule यांनी सांगितलं कारण