Akola Water Crisis : नुसतीच बडी बडी नावं, 40 वर्षांपासून पाणी नाही, अकोल्यात महिलांचा एल्गार
अकोला शहरात मोठी मोठी नाव आहेत. पण, पाण्याची मात्र बोंब आहे. आता उन्हाळा खऱ्या अर्थानं सुरू झाला. पण, गेल्या चाळीस वर्षांपासून पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळं संतप्त झालेल्या माहिलांना महिपालिकेसमोर पाण्यासाठी आंदोलन केलं.
Mar 30, 2022 | 5:53 PM
गणेश सोनोने | Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल
Mar 30, 2022 | 5:53 PM
अकोल्यातल्या प्रभाग क्रमांक 8 मधील लहरिया नगर, नागेवाडी, वाकापूर प्रभागातील रहिवाशांनी हे आंदोलन केलं.
1 / 5
संतप्त झालेल्या महिलांनी आयुक्त यांच्या कार्यालासमोर माठ फोडले. कळसी व हांडे फेकून निषेध केला.
2 / 5
आंदोलनकर्त्या महिलांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला.
3 / 5
अकोल्यात प्रभाग क्रमांक 8 मधील महिलांनी पाणी पुरविण्याच्या मागणीसाठी महानगरपालिकेसमोर आंदोलन केलं. यावेळी महिला आक्रमक झाल्या होत्या.
4 / 5
गेल्या चाळीस वर्षापासून पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिला संतापल्या. दर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.