गुवाहाटीत होतो, सांगेल तिथे सह्या करत होतो, एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी

| Updated on: Jan 27, 2023 | 8:13 AM

गुवाहाटीत असताना आमच्याकडे खूपच वेळ होता. त्यावेळी काय होते आमदार सांगत होते, तेथे सह्या करत होते. त्यामुळे आमदारांनी जास्त निधी मिळवून तला. तुमचे आमदार प्रताप सरनाईक निधी आणायला खूप हुशार आहेत. जेवढी कामं गेल्या काही वर्षात त्यांच्या मतदार संघात झाली आहेत,

गुवाहाटीत होतो, सांगेल तिथे सह्या करत होतो, एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी
Follow us on

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अनेकदा महाविकास आघाडीवर चौफेर फटकेबाजी करीत असतात. कोरोना काळात सरकार (Corona) कसे चालले होते, त्याचा उल्लेख करतात. आमदारांचे किस्से सांगतात. ठाणे येथील उपवन फेस्टीवल (Thane Festival) कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी चांगली टोलबाजी करत ठाणे शहराच्या विकासाचे व्हिजन सांगितले. दोन वर्षाच्या खंडानंतर ठाणे शहरात हा कार्यक्रम झाला. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारकडून गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली. तसेच येत्या काही वर्षांत ठाणे आणि मुंबईचा चेहरा कसा बदलणार आहे, हे त्यांनी सांगितले.

गुवाहाटीत असताना आमच्याकडे खूपच वेळ होता. त्यावेळी काय होते आमदार सांगत होते, तेथे सह्या करत होते. त्यामुळे आमदारांनी जास्त निधी मिळवून घेतला. तुमचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)निधी आणायला खूप हुशार आहेत. जेवढी कामं गेल्या काही वर्षात त्यांच्या मतदार संघात झाली आहेत, तितकी कोणत्याही मतदार संघात झाली नाहीत, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी सरनाईक यांचे कौतूक केले.

हे सुद्धा वाचा

मग उत्सव झाले नसते

आमचे सरकार बनले नसते तर राज्यात कोणतेही उत्सव पुन्हा सुरु झाले नसते. गोविंदा झाला नसता, गणपती आले नसते, अन् नवरात्र दिवाळी झाली नसती, कारण चीनमध्ये कोरोना सुरु झाला आहे, असे सांगत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला लक्ष केले.

ठाणे पुर्ण बदलणार

ठाणे शहरात चांगले रस्ते होणार आहे, सुशोभिकरण करण्यात येणार आहे. नितीन गडकरी यांनी ज्या पद्धतीने नागपुरात मेट्रो उभारले, तसे आपण ठाण्यात उभारणार आहे. मेट्रोमुळे तुमचा प्रवासाचा वेळ वाचेल. रस्त्यावरील वाहतूक कमी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासासाठी सर्व मदत करायला तयार आहे. यामुळे मुंबई अन् ठाणे तुम्हाला काही वर्षांत पुर्णपणे बदलले दिसणार आहे.