बागेश्वर धामच्या ‘मन की बात’चे सुहानी शाहने उलगडले रहस्य? केली लाईव्ह टेस्ट

माइंड रीडर सुहानी शाहने या शो दरम्यान, प्रेक्षकांसोबत थेट चाचण्या केल्या. शोमध्ये मनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार त्या एका पाटीवर लिहून ठेवत होत्या. मग त्या व्यक्तीला त्याने काय विचार केला होतो, ते विचारुन पाटीवरील उत्तर दाखवत होते. दोन्ही गोष्टी अगदी सेम टू सेम येत होत्या.

बागेश्वर धामच्या 'मन की बात'चे सुहानी शाहने उलगडले रहस्य? केली लाईव्ह टेस्ट
बागेश्वर धाम व सुहानी शाहImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 1:29 PM

नवी दिल्ली : बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यामुळे त्यांचा दरबारात देशभरातून अनेक जण येत आहेत. बागेश्वर धामच्या दाव्यावर मोठी चर्चा सध्या सुरु आहे. मुंबईच्या सुहानी शाहने बागेश्वर धामच्या ‘मन की बात’चे रहस्य एका वृत्तवाहिनीच्या शोमधून उलगडले. ‘मन की बात’ ओळखणे ही अद्दश्य शक्ती आहे की ट्रिक हे तिने प्रत्यक्ष लाईव्ह करुन दाखवले.

बागेश्वर धाम लोकांचे मन कसे समजून घेतात. हजारो लोक बाबांच्या दरबारात केवळ करिअर आणि भविष्याशी संबंधित समस्या घेऊनच येत नाहीत तर त्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठीही येतात.पण बाबा खरेच असाध्य रोग बरे करू शकतात का? हे विज्ञानाला आव्हान नाही का? या सर्व प्रश्नांची थेट चाचणी लाईव्ह शोमधून घेण्यात आली. माइंड रीडर सुहानी शाहने या शो दरम्यान, प्रेक्षकांसोबत थेट चाचण्या केल्या. शोमध्ये मनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार त्या एका पाटीवर लिहून ठेवत होत्या. मग त्या व्यक्तीला त्याने काय विचार केला होतो, ते विचारुन पाटीवरील उत्तर दाखवत होते. दोन्ही गोष्टी अगदी सेम टू सेम येत होत्या.

सुहानी शाहला या शो दरम्यान एका मुलीच्या मनाची गोष्ट कळली. त्याने एका मुलीला कागदावर काहीतरी लिहायला सांगितले. यानंतर सुहानीने मुलीला तिने लिहिलेल्या शब्दांचा विचार करण्यास सांगितले. यानंतर सुहानीने मुलीला सांगितले की, तुझ्या आजीची तब्येत ठीक नाही आणि तू हेच लिहिले आहेस. काळजी करू नका. अर्थात सुहानीचे उत्तर बरोबर आले.

हे सुद्धा वाचा

शिवानी दुर्गा यांनीही दिले उत्तर

सुहानी शाहने तंत्रविज्ञानच्या जानकार शिवानी दुर्गा यांचाही प्रश्न सोडवला. त्यांच्या प्रश्नाच्या वेळी त्या शोमध्ये प्रत्यक्ष नव्हत्या. तर लाईव्हच्या माध्यमातून होत्या. त्यानंतर कॅम्प्यूटर बाबाच्या गुरुचे नाव यांच माध्यमातून सांगितले.

या कलेवर सुहानी काय म्हणते

बागेश्वर धाम जे करतात तेच सुहानी शाह करत आहे. आपल्याजवळ असलेली ही देण एक कला व ट्रिक असल्याचे ती सांगते. मी सराव करुन तिला अधिक विकसित केले आहे. ही कला आपण कोणालाही शिकवण्यास तयार असल्याचे तिने स्पष्ट केले. सुहानी शाह म्हणते, लहानपणापासून माईंड रिडिंगचं मला पॅशन होतं, ते मी पूर्ण केलं, मी पहिलीची शिकली असली, तरी मी या कलेवर पुस्तकं लिहिली आहेत. कारण देशभर फिरत असताना अनेक लोकांशी भेटीगाठी आणि संवाद झाले यात भाषेचं ज्ञान मिळालं. मी माझी इंग्रजी अधिक सुधारण्यावर अजुनही भर देत आहे. भारतात सोशल मीडियावर बाबा धीरेंद्र नंतर सुहानी शाह चर्चेत आली आहे, तिच्या या कलेमुळे.

कोण आहे सुहानी शाह

सुहानी शाह प्रसिद्ध माइंड रीडर आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखण्याचे काम त्या करत आहेत. यासंदर्भात तिने अनेक लाईव्ह शो केले आहेत. फक्त पहिलीपर्यंत शिक्षण सुहानीचे झाले आहे. ६० विद्यार्थ्यांसोबत राहण्यापेक्षा ६० हजार लोकांसमोर कार्यक्रम घेण्याचा तिच्या वडिलांनी सल्ला दिला. त्यानंतर शाळा सोडली अन् लाईव्ह शो करुन लोकांचे मन ओळखू लागल्या.

बाबा धीरेंद्र हे सोशल मीडियावर चर्चेत 

सध्या सोशल मीडियावर एक नाव खूप चर्चेत आहे ते म्हणजे सुहानी शाह. पण खरं पाहता हि सुहानी शहा नक्की आहे तरी कोण आणि का हि आज इतक्या प्रसिद्ध झोतात आली आहे. सध्या देशपातळीवर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांची चर्चा सुरु आहे.

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या बद्दल आज अनेकांना माहिती आहे. हे आपल्याला सनातनी धर्माचा प्रसारक मानतात. ते आपल्या शक्तीने अनेकांचे प्रश्न सोडवताना त्यांच्या व्हिडिओमधून दिसतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून धीरेंद्र कृष्ण महाराज यांना चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान देण्यात आलं होतं.

हे आव्हान देखील महाराजांनी स्वीकारले आहे तेंव्हा पासून त्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. सोबतच सुहानी शाहचे देखील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तितकेच व्हायरल होत आहेत. ती देखील महाराजांप्रमाणे कोणताही प्रश्न वगैरे न विचारताच त्यावरचं उत्तर आधीच लिहून ठेवण्याचं प्रात्याक्षिक एका वृत्तवाहिनीवर करून दाखवलं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.