कोट्यावधींच्या कामाची बॅनरबाजी, बॅनर फाटले तरी कामाला सुरुवात नाही; मनसे आमदाराची घणाघाती टिका

| Updated on: Oct 26, 2021 | 10:34 PM

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नागरी समस्यांसंदर्भात भाजप आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या आमदारांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. मनसे आमदार राजू पाटील यांनी खराब रस्ते, 27 गावातील पाणी प्रश्न, काही विकास कामांसदर्भात आयुक्तांशी चर्चा केली.

कोट्यावधींच्या कामाची बॅनरबाजी, बॅनर फाटले तरी कामाला सुरुवात नाही; मनसे आमदाराची घणाघाती टिका
कोट्यावधींच्या कामाची बॅनरबाजी, बॅनर फाटले तरी कामाला सुरुवात नाही; मनसे आमदाराची घणाघाती टिका
Follow us on

कल्याण : खराब रस्त्यासाठी तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचे विधान मंत्री जयंत पाटील यांनी कल्याणमध्ये केले होते. त्यांच्या या विधानावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पलटवार केला आहे. तत्कालीन सरकार युतीचे होते. त्यात शिवसेनाही होती. नक्की त्यांनी हा प्रश्न शिवसेनेला विचारला पाहिजे असा टोला राजू पाटील यांनी लगावला आहे. इतकेच नाही रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाल्याची बॅनरबाजी केली जाते. बॅनर फाटले तरी काम सुरु झालेले नाही असा देखील टोला पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे. नागरी समस्या संदर्भात भाजप आमदारांपाठोपाठ मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांची आज भेट घेतली.  (Work does not begin even if the banner is torn; MNS MLA’s harsh criticism)

दोन्ही स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नागरी समस्यांसंदर्भात भाजप आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या आमदारांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. मनसे आमदार राजू पाटील यांनी खराब रस्ते, 27 गावातील पाणी प्रश्न, काही विकास कामांसदर्भात आयुक्तांशी चर्चा केली. या बैठकी दरम्यान फेरीवाल्यांविषयी आयुक्तांना सांगण्यात आले. कल्याण डोंबिवली या दोन्ही रेल्वे स्थानक परिसर दिवाळीनंतर फेरीवाला मुक्त झाला पाहिजे अन्यथा आम्ही आमच्या परीने करुन घेऊ जे नियमात आहे ते लवकर करा असा इशारा आयुक्तांना दिला आहे.

आम्ही श्रेय घेणार म्हणून नागरिकांचे आंदोलन दडपले

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील खराब रस्त्यांसाठी नागरिक रविवारी आंदोलन करणार होते. ते आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनास मनसेचा पाठिंबा होता. मनसे याचे श्रेय घेणार म्हणून ते आंदोलन दडपण्यात आले. रातोरात रस्ता तयार करण्यात आला. मात्र त्याची क्वालिटी खराब होती.

कामासाठी कोट्यवधी मंजूर झाले पण काम सुरुवात नाही

निवडणुका आल्या की बॅनरबाजी केली जाते. 111 कोटी आले, 137 कोटी आले. पैसे आले तर रस्ते कुठे दिसतात. जे बॅनर लावले ते फाटायला आले. अजून टेंडर नाही. म्हणजे अजून काम सुरुच नाही अशी घणाघाती टिका मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.

भाजप आमदाराचाही केडीएमसी आयुक्तावर गंभीर आरोप

नागरी समस्यांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासन काय काय करणार याचा प्रशासनाने अनुपालन अहवाल सादर करा अशी मागणी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे. कामासंदर्भात निर्णय योग्य प्रकारे घेतले नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असा इशारा भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे. आज त्यांची भाजप पदाधिकाऱ्यांसाबत केडीएमसी आयुक्तांशी चर्चा केली आहे. (Work does not begin even if the banner is torn; MNS MLA’s harsh criticism)

इतर बातम्या

भरती प्रक्रियेत पुन्हा गोंधळ, हॉलतिकीट ग्राह्य न धरण्याचे विद्यार्थ्यांना मेसेज, न्यासा कंपनीविरोधात तक्रार दाखल

रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! धुक्यामुळे 18 गाड्या रद्द, 2 गाड्या अंशतः रद्द, संपूर्ण यादी तपासा