चेष्टा करण्यापेक्षा मारून टाका, तिवरे धरणफुटी पीडितांचा संताप, लोकार्पण झालेल्या घरांना गळती

| Updated on: Jul 03, 2021 | 7:41 AM

तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने 5 कोटींचा निधी दिला होता. या निधीतून 24 घर बांधण्यात आली होती.

चेष्टा करण्यापेक्षा मारून टाका, तिवरे धरणफुटी पीडितांचा संताप, लोकार्पण झालेल्या घरांना गळती
Tiware Dam breached
Follow us on

रत्नागिरी : संपूर्ण गाव झोपेच्या स्वाधीन होत असतानाच रात्री साडे नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं आणि 21 जणांचा जीव गेला. 2 जुलै 2019 रोजी ही हृदयद्रावक घटना घडली होती. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटी दुर्घटनेला 2 जुलैला दोन वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर दुर्घटनेत घर वाहून गेलेल्यांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या निधीतून 24 घरांचे लोकार्पण करण्यात आले. मात्र या घरांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी ही घर ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. (Tiware dam breach rehabilitation home Water leaking Issue)

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

तिवरे धरण फुटी दुर्घटनेला नुकतंच दोन वर्ष पूर्ण झाली. या दुर्घटनेत घर वाहून गेलेल्या कुटुंबांना हक्काची घर देण्याची घोषणा करण्यात आली होती. तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने 5 कोटींचा निधी दिला होता. या निधीतून 24 घर बांधण्यात आली होती. काल या घरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

घरांच्या स्लॅबमधून थेट घरात पाणी

मात्र तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांना दिलेल्या घरांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या लोकार्पण केलेल्या 10 घरांपैकी 2 घरातील स्लॅबमधून थेट घरात पाणी येत आहे. या घरातील 4 नंबर आणि 9 नंबर घरात अनेक ठिकाणी घराला गळती लागली आहे.

चेष्टा करण्यापेक्षा मारून टाका, पीडितांचा संताप

अशाप्रकारची घर आणि त्याची अवस्था पाहून लाभार्थ्यांनी घर ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. अशी चेष्टा करण्यापेक्षा मारून टाका, असा संताप एका 70 वर्षांच्या आजी राधिका चव्हाण यांना व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ऑनलाईन लोकार्पण झाल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

(Tiware dam breach rehabilitation home Water leaking Issue)

संबंधित बातम्या : 

तिवरे धरण पुन्हा बांधलं जाणार, भूगर्भतज्ज्ञांकडून पाहणी

तिवरे धरणफुटीला दोन वर्ष पूर्ण, पीडितांना लवकरच हक्काची घरं मिळणार