AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिवरे धरणफुटीला दोन वर्ष पूर्ण, पीडितांना लवकरच हक्काची घरं मिळणार

तिवरे धरण फुटीमध्ये 54 कुटुंबाचे स्थलांतरण करण्यात आलं होतं. त्यातील पहिल्या 14 घरांचा ड्रॉ लवकरच निघणार आहे. (Tiware dam breach Ten families rehabilitation soon)

तिवरे धरणफुटीला दोन वर्ष पूर्ण, पीडितांना लवकरच हक्काची घरं मिळणार
Tiware dam
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 2:47 PM
Share

रत्नागिरी : संपूर्ण गाव झोपेच्या स्वाधीन होत असतानाच रात्री साडे नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं आणि 21 जणांचा जीव गेला. 2 जुलै 2019 रोजी ही हृदयद्रावक घटना घडली होती. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटी दुर्घटनेला येत्या 2 जुलैला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यंदा याच दिवशी या दुर्घटनेत घर वाहून गेलेल्या दहा कुटुंबाना हक्काची घरं दिली जाणार आहेत. (Tiware dam breach Ten families rehabilitation soon)

घरांचा ड्रॉ लवकरच निघणार

तिवरे धरण फुटी दुर्घटनेला यंदा दोन वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 2 जुलैला या दुर्घटनेतील दहा कुटुंबांना हक्काची घर मिळणार आहेत. सध्या ही कुटुंब सरकारने तात्पुरते राहण्यासाठी व्यवस्था केलेल्या कंटेनरमध्ये राहत आहेत. यामुळे या दुर्घटनेत वाहून गेलेल्या घरांसाठी लवकर ड्रॉ काढला जाणार आहे. तिवरे धरण फुटीमध्ये 54 कुटुंबाचे स्थलांतरण करण्यात आलं होतं. त्यातील पहिल्या 14 घरांचा ड्रॉ लवकरच निघणार आहे.

तिवरे धरण दुर्घटना

कोकणातील तुफान पावसाने 2019च्या जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने अनेक जण वाहून नेले. 2 जुलैच्या रात्री ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.

चक्क धरणच फुटल्याने परिसरातील ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावात पाणी घुसलं. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या त्यामध्ये 24 नागरिक वाहून गेले. घरं वाहून गेली, प्रापंचिक साहित्य विस्कटून गेलं. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली होती. तर आजूबाजूच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली होती.

तत्कालीन मंत्र्यांचा अजब दावा

तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा अजब दावा तत्कालीन जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. “धरण जवळपास 2004 साली कार्यान्वित झालं होतं. 15 वर्षांपासून त्यात पाणी साठतं. पण कोणतीच दुर्घटना घडली नव्हती. तिथं खेकड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यातूनच गळती सुरु झाली. ही बाब गावकऱयांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीही केली. ही दुर्घटना दुर्देवी म्हणाले लागेल. पाण्याची पातळी 8 तासांत 8 मीटरने वाढली होती”, असं वक्तव्य तत्कालीन जलसंधारणमंत्र्यांनी केलं होतं.

तिवरे धरण

फुटलेल्या तिवरे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2 हजार 452 दशलक्ष घनफूट इतकी होती. या धरणाची लांबी 308 मीटर तर उंची 28 मीटर होती. 2004 मध्ये या धरणातील गाळ उपसण्यात आला होता.

(Tiware dam breach Ten families rehabilitation soon)

संबंधित बातम्या : 

तिवरे धरण पुन्हा बांधलं जाणार, भूगर्भतज्ज्ञांकडून पाहणी

तिवरे धरण फुटीला 1 वर्ष पूर्ण, आमचं घरदार, 21 माणसं गेली, न्याय कधी? तिवरेकरांचा सवाल

तिवरे धरणफुटीमागील खरा ‘खेकडा’ कोण? चौकशी अहवाल 8 दिवसात सरकारच्या हाती

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.