तिवरे धरणफुटीमागील खरा ‘खेकडा’ कोण? चौकशी अहवाल 8 दिवसात सरकारच्या हाती

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीचा (Tiware Dam breached) अहवाल येत्या आठ दिवसात सरकारला सादर होणार आहे. जलसंधारण विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

तिवरे धरणफुटीमागील खरा 'खेकडा' कोण? चौकशी अहवाल 8 दिवसात सरकारच्या हाती
Follow us
| Updated on: Dec 23, 2019 | 10:18 AM

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीचा (Tiware Dam breached) अहवाल येत्या आठ दिवसात सरकारला सादर होणार आहे. जलसंधारण विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या अहवालामुळे तिवरे धरणफुटीमागचा खेकडा कोण हे स्षष्ट होणार आहे. सरकारला सादर होणारा अहवाल पूर्णतः गोपनीय असेल. तिवरे धरण फुटल्याने (Tiware Dam breached) भेंदवाडीतल्या 23 जणांचा बळी गेळा होता. या दुर्घेटनेच्या तपासणीसाठी सरकारने एसआयटी नेमली होती. या चौकशी समितीने तपास करुन अपला अहवाल तयार केला आहे.

तिवरे धरण दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. यात जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे हे या पथकाचे प्रमुख होते. या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश होता. त्यामुळे दुर्घेटनेत ठपका कुणावर याची जिल्हावासीयांना उत्सुकता लागली आहे.

तिवरे धरण दुर्घटना

कोकणातील तुफान पावसाने जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. चक्क धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने अनेक जण वाहून नेले. 2 जुलैच्या रात्री ही दुर्घटना घडली.  या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेने थरकाप उडाला. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. 

चक्क धरण फुटल्याने धरण क्षेत्रात येणाऱ्या ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावात पाणी घुसलं. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या त्यामध्ये 24 नागरिक वाहून गेले. अनेक घरात पाणी घुसलं. प्रापंचिक साहित्य विस्कटून गेलं.  धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली. तर आजूबाजूच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली.

तिवरे धरण

फुटलेल्या तिवरे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2 हजार 452 दशलक्ष घनफूट इतकी होती. या धरणाची लांबी 308 मीटर तर उंची 28 मीटर होती. 2004 मध्ये या धरणातील गाळ उपसण्यात आला होता.

संबंधित बातम्या  

Tiware Dam Breached : तिवरे धरण फुटलं, नेमकं काय घडलं?

तिवरे धरण खेकड्यानी फोडलं, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा अजब दावा 

तिवरे धरणग्रस्तांची थट्टा, अधिकारी म्हणतात – वाहून गेलेल्या वस्तूंची बिलं आणा 

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.