AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiware Dam Breached : तिवरे धरण फुटलं, नेमकं काय घडलं?

कोकणातील तुफान पावसाने चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. चक्क धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने 24 जणांना वाहून नेले.

Tiware Dam Breached : तिवरे धरण फुटलं, नेमकं काय घडलं?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 03, 2019 | 9:47 AM
Share

Tiware Dam Breached रत्नागिरी : कोकणातील तुफान पावसाने चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. चक्क धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने 24 जणांना वाहून नेले. सकाळी पावणे 10 पर्यंत पाच जणांचे मृतदेह हाती आले असून, बेपत्ता नागरिकांचा शोध सुरु आहे. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेने थरकाप उडाला. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली आहे. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

नेमकं काय घडलं?

कोकणसह राज्यभरात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाने कहर माजवला आहे. त्याचाच परिणाम म्हणून तिवरे-खडपोली धरण मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास भरलं. आधीच धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्याचा धोका स्थानिकांच्या लक्षात आला. काही क्षणात धरणाला भगदाड पडलं आणि एकच खळबळ उडाली. नागरिकांनी याची माहिती प्रशासनालाही दिली.

धोका नसल्याची माहिती खोटी ठरली

धरण फुटू शकते या भितीमुळे नागरिकांनी पाठबंधारे विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली. त्यानंतर धरणाचे परीक्षण केल्यानंतर ओव्हरफ्लो होणारे पाणी शास्त्री नदी आणि वशिष्ठीच्या खाडीला मिळत असल्याने त्याचा ग्रामस्थांना धोका नसल्याचे पाठबंधारे विभागाने सांगितले. 

गळतीमुळे धरण फुटल्याचा आरोप

गावातील नागरिकांनी  तिवरे धरण हे 100 टक्क्यांपैकी केवळ 27.59 टक्केच भरले होते. त्यामुळे हे धरण गळतीमुळेच धरण फुटल्याचा आरोप केला आहे.

कोणती गावं पाण्याखाली?

चक्क धरण फुटल्याने धरण क्षेत्रात येणाऱ्या ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावात पाणी घुसलं. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या त्यामध्ये 24 नागरिक वाहून गेले. अनेक घरात पाणी घुसलं. प्रापंचिक साहित्य विस्कटून गेलं.  धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली आहे. तर आजूबाजूच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

बचावकार्य वेगाने

दरम्यान, या धरणफुटीची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्याला सुरुवात केली. रत्नागिरीचे जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री साडेदहाच्या सुमारास रत्नागिरी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षकही घटनास्थळी रवाना झाले. याशिवाय प्रशासनाने रत्नागिरीसह एनडीआरएफच्या पुणे, सिंधुदुर्गातील एनडीआरएफच्या पथकांना पाचारण केलं.

तिवरे धरण

फुटलेल्या तिवरे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2 हजार 452 दशलक्ष घनफूट इतकी होती. या धरणाची लांबी 308 मीटर तर उंची 28 मीटर आहे. 2004 मध्ये या धरणातील गाळ उपसण्यात आला होता.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग