AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ

मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे… बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ

| Updated on: Jul 29, 2026 | 5:05 PM
Share

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मोठा दावा केला आहे. शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात कथित राजकीय चर्चा झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मोठा दावा केला आहे. शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात कथित राजकीय चर्चा झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार एनडीएमध्ये जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार, अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, शरद पवार यांनी दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

यानंतर अंजली दमानिया यांनी आणखी एक दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात शरद पवार यांनी आपला पक्ष परत मिळावा, अशी कथित चर्चा अमित शाह यांच्यासोबत झाली आहे.

यावेळी दमानिया म्हणाल्या, “एनडीएत सामिल होण्यासाठी त्यांना दोन मंत्रीपद महाराष्ट्रात आणि सुप्रिया सुळे यांना दिल्लीत जागा मिळणार आहे.” तसेच त्यांनी दावा केला की, शरद पवार यांनी त्यांच्या खासदारांकडून डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा मिळेल, असे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली, तसेच सुप्रिया सुळे यांनीही भेट घेतल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केला. मात्र, या दाव्यांवर संबंधित नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Published on: Jul 29, 2026 05:05 PM

Follow Us