मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग
राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याबाबत माहिती समजू शकलेली नाही.
राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याबाबत माहिती समजू शकलेली नाही. मात्र गेल्या काही काळापासून शरद पवारांची राष्ट्रवादी अजित दादांच्या राष्ट्रवादीत विलीन होऊन NDA मध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून शरद पवार हे पुण्यातील निवासस्थानी आहेत. आज गुरूपौर्णिमा असल्याने अनेक कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. त्यानंतर आज दुपारी दिलीप वळसे पाटील हेही शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रिकरण आणि पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार अशी चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेटी गाठींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांची भेट घेत असल्याचे समोर आले आहे.
Published on: Jul 29, 2026 04:52 PM
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी

