तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी… अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके हे छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी परतले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने हा लढा आंदोलनाचं मोठं यश मानला जात आहे.

अभिजीत दीपके यांच्या घरी परतल्यानंतर त्यांचे वडील भगवान दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, अभिजीतने केलेलं काम अत्यंत मोठं असून, त्याने थेट राजसत्तेला आव्हान दिलं. मात्र, या संघर्षासाठी त्याने स्वतःचं करिअरही पणाला लावल्याचं त्यांनी नमूद केलं.
भगवान दीपके म्हणाले, “अभिजीतला अनेक चांगल्या नोकरीच्या ऑफर्स होत्या. तो अमेरिकेतून शिक्षण घेऊन आला होता. अनेक जण चांगली नोकरी मिळाल्यानंतर ती सोडत नाहीत, पण त्याने देशासाठी संघर्षाचा मार्ग निवडला. त्याने स्वतःचं करिअर उद्ध्वस्त केल्यासारखं केलं, पण त्याच्या धैर्याचा मला अभिमान आहे.”
ते पुढे म्हणाले की, आंदोलनादरम्यान मुलाच्या सुरक्षिततेची सतत चिंता होती. “त्या काळात तो आमच्याशी फार कमी बोलायचा. कधी 30 सेकंदांपेक्षा जास्त संवादही होत नव्हता. तो सुखरूप घरी परतला, ही आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.
भगवान दीपके यांनी नागरिकांनाही आवाहन करत म्हटलं की, अभिजीतने वैयक्तिक आयुष्यापेक्षा देशहिताला प्राधान्य दिलं आहे. “मी माझ्या घरापुरता विचार करत होतो, पण तो आता देशाचा भक्त झाला आहे. त्यामुळे सर्वांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं,” असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणावरून उभ्या राहिलेल्या आंदोलनानंतर अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाची देशभरात चर्चा सुरू असून, त्यांच्या वडिलांच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे या आंदोलनाकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
Published on: Jul 29, 2026 04:59 PM
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर
जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं; जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर...