अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आंदोलनातील महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर पोलिसांकडून कारवाई झाल्याचा आरोप केला. या प्रकरणात अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते. दरम्यान, काही आंदोलकांनी सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला असून त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेत काही पोलिस कर्मचारी आणि काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “पोलिसांनी महिलांना आणि अल्पवयीन मुलींना मारलं. अमित शाहांना याबाबत माहिती नाही का. उलट त्यांनीच पोलिसांना आदेश दिले, त्यांना आदेश देताना मी पाहिलं.”
Published on: Jul 29, 2026 06:52 PM
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...