दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी तरुणींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना कंगना रणौत यांनी काही तरुणींवर टीका करत त्यांना "गटर जनरेशन" असे संबोधले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी तरुणींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना कंगना रणौत यांनी काही तरुणींवर टीका करत त्यांना “गटर जनरेशन” असे संबोधले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
कंगना रणौत यांनी दावा केला की, ही पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव असलेली भारतीय महिलांची नवी पिढी आहे. त्यांच्या मते, या पिढीतील काही तरुणी शिक्षण, व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक मूल्यांच्या बाबतीत आदर्श नसून, त्यांची मानसिकता समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी कंगना रणौत यांनी पुढे असेही वक्तव्य केले की, काही तरुणी स्वातंत्र्याच्या नावाखाली अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान आणि वैयक्तिक जीवनशैलीचे सार्वजनिक प्रदर्शन करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. अशा प्रवृत्ती समाजासाठी योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, कंगना रणौत यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. त्यांच्या विधानावर विरोधक तसेच विविध महिला संघटना आणि सामाजिक संघटनांकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या वक्तव्यावरून नव्या वादाची चिन्हे दिसत आहेत.
Published on: Jul 29, 2026 05:48 PM
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...

