नाशिक जिल्ह्यात 634 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाडमधील 100, सिन्नरच्या 80 जणांचा समावेश

| Updated on: Nov 02, 2021 | 1:31 PM

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी 634 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात निफाडमधील 100, सिन्नरमधील 80 रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात 634 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाडमधील 100, सिन्नरच्या 80 जणांचा समावेश
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिक: नाशिक जिल्ह्यात मंगळवारी 634 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात निफाडमधील 100, सिन्नरमधील 80 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 611 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 634 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 26, बागलाण 8, चांदवड 29, देवळा 20, दिंडोरी 20, इगतपुरी 6, कळवण 5, नांदगाव 9, निफाड 100, सिन्नर 80, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 1, येवला 36 अशा एकूण 346 जणांचा समावेश. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 250, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 8 तर जिल्ह्याबाहेरील 30 रुग्ण असून असे एकूण 634 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात काल आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 1, चांदवड 3, दिंडोरी 1, इगतपुरी 1, नांदगाव 2, निफाड 06, सिन्नर 08 अशा एकूण 22 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश ग्रामीण भागात आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 927 रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे 97.11 टक्के, नाशिक शहरात 98.16 टक्के, मालेगावमध्ये 97.12 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.73 इतके आहे. तर नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 201 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 3 हजार 998, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 357 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 681 कोरोना रुग्णांचा मृत्यू नाशिक जिल्ह्यात झाला आहे.

विक्रमी लसीकरण

एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे. नाशिक विभागाला पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यामुळे हे लसीकरण करण्यात आले. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या दोन प्रकारच्या कोरोना लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, तरीही नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णात अनेक ठिकाणी वाढ होताना दिसत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 611 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 634 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
– डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी (Treatment started on 634 corona patients in Nashik district)

इतर बातम्याः

Nashik weather: उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतरच; दक्षिण महाराष्ट्रात मात्र ऐन दिवाळीत धारानृत्य!

सोमय्यांना आधी कळतं अन् नंतर कारवाई होते, देशमुख अटकेवर भुजबळांची प्रतिक्रिया; देशभर असे प्रकार सुरू असल्याचा दावा