Ganpat Gaikwad Firing | गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड कोर्टात हजर , परिसरात संचारबंदी

| Updated on: Feb 14, 2024 | 9:04 AM

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज त्यांना उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Ganpat Gaikwad Firing | गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड कोर्टात हजर , परिसरात संचारबंदी
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, उल्हासनगर | 14 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज त्यांना उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कलम १४१ लावण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार करणारे आमदरा गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती.

सुरक्षेच्या हेतूने त्यांना आज पहाटेच त्यांना न्यायलयात आणण्यात आले. न्यायालयाच्या परिसरातील वाहतुकीत बदल करत 200 मीटर पर्यंत कोणालाही न्यायालयाच्या आवारात फिरकता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. तर दोनशे मीटरच्या बाहेर पोलिसांनी बॅरिगेट लावून रस्ता बंद करत पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला. माध्यम प्रतिनिधींना देखील न्यायालयात व न्यायालयाच्या परिसरात 200 मीटर आज येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या गोळीबारानंतर गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मी गोळीबार केला असून, मला कोणताही पश्चाताप नसल्याचे विधान करीत मुख्यमंत्र्यांवर आरोप केले होते. तसा प्रकार घडू नये, गायकवाड यांनी माध्यमांशी बोलू नये, पोलिस व्हॅनच्या बाहेर डोके काढत प्रसार माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करू नये या साठी पोलीस हे माध्यम प्रतिनिधींना लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय आहे प्रकरण ?

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महेश गायकवाड यांच्या शरीरातून 6 तर राहुल पाटील यांच्या शरीरातून 2 गोळ्या काढण्यात आल्या. दोघांची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती मिळत आहे. तर गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आज त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना उल्हासनगर येथील न्यायालसमोर हजर करण्यात आले. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.