Mumbai to Solapur via Pune VandeBharat : वंदेभारत एक्स्प्रेसला पुण्यालाही थांबा, मुंबई ते सोलापूर व्हाया पुण्याला चला !

| Updated on: Feb 02, 2023 | 4:08 PM

सकाळी मुंबईतून शिर्डीला साईबाबांच्या दर्शना जाणाऱ्या साईभक्तांना या साईनगर-शिर्डी वंदेभारत फायदा होणार आहे तर सोलापूरहून मुंबईत कामानिमित्त आलेल्यांना सोलापूर वंदेभारत फायद्याची ठरणार आहे. 

Mumbai to Solapur via Pune VandeBharat  : वंदेभारत एक्स्प्रेसला पुण्यालाही थांबा, मुंबई ते सोलापूर व्हाया पुण्याला चला !
vandepune
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : पुढील आठवड्यापासून पुणेकरही आलिशान वंदेभारतने ( VANDEBHARAT ) प्रवास करु शकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 10 फेब्रुवारीला दोन वंदेभारतचे उद्धाटन होणार आहे. मुंबई छत्रपती शिवाज महाराज टर्मिनस ते सोलापूर ( SOLAPUR ) आणि साईनगर-शिर्डी अशा दोन वंदेभारतचे उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सोलापूरला जाणारी वंदेभारत पुणे  (PUNE ) मार्गे जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना देखील आलिशान वंदेभारतचा फायदा होणार आहे.

शिर्डीला जाणारी ट्रेन पुण्याला काही मिनिटांचा थांबा घेणार आहे. त्यानंतर ती सोलापूरला रवाना करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या दहा फेब्रुवारी रोजी सीएसएमटी स्थानकात दोन वंदेभारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या दोन वंदेभारतच्या उद्गाटनामुळे महाराष्ट्र हे पहीलेच दोन दोन वंदेभारत राज्य अंतर्गत चालणारे पहीले राज्य ठरणार आहे. या वंदेभारतच्या समावेशाने महाराष्ट्राला मिळालेल्या वंदेभारत एक्सप्रेसची संख्या चार झाली आहे. कारण मध्य रेल्वेची नागपूर ते बिलासपूर ( झारखंड ) ही महाराष्ट्राला मिळालेली दुसरी वंदेभारत आहे. तर पहिली वंदेभारत पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते गांधी नगर ( गुजरात ) अशी चालविण्यात येत आहे.

असे असणार वेळापत्रक 

ही ट्रेन सोलापुर स्टेशनहून स. 6:50 बजे मुंबईकडे रवाना होईल, आणि स. 9 वाजता पुणे स्टेशनला पोहचेल. नंतर दु. 12:30 वाजता ती मुंबईला पोहचेल. त्यानंतर सायं. 4.10 वाजता मुंबईहून पुन्हा रात्री 7.30 वाजता पुणे स्टेशनला पोहचेल. त्यानंतर ती रा. 10:40 वाजता सोलापुर स्थानकात पोहचेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे येत्या दहा फेब्रुवारीला या दोन्ही आलिशान ट्रेनना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन मुंबई ते सोलापुर दरम्यान 110 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे. ही आठवड्यातून सहा दिवस चालविण्याची योजना आहे. मुंबईहून बुधवारी आणि सोलापुरहून गुरुवारी ट्रेन धावणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

असा होणार फायदा

सकाळी मुंबईतून शिर्डीला साईबाबांच्या दर्शना जाणाऱ्या साईभक्तांना या साईनगर-शिर्डी वंदेभारत फायदा होणार आहे तर सोलापूरहून मुंबईत कामानिमित्त आलेल्यांना सोलापूर वंदेभारत फायद्याची ठरणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची वैशिष्ट्ये

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी उत्तम सुविधा आहेत. या ट्रेनचे डबे शताब्दीसारखे आहेत. सर्व कोचला स्वयंचलित उघडझाप होणारे दरवाजे आहेत. GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणाली, मनोरंजनासाठी ऑनबोर्ड हॉट स्पॉट वाय-फाय सुविधा, रोटेट होणाऱ्या चेअर, डब्यांमधील प्रसाधनगृहात विमानासारखे बायो-व्हॅक्यूम टॉयलेट बसविण्यात आले आहे. साइड रिक्लायनर सीटचीही सोय आहे. अर्थात एक्झिक्युटिव्ह क्लासच्या प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. ट्रेनमध्ये 1128 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. दिव्यांग प्रवाशांसाठी डब्यात व्हीलचेअर ठेवण्यासाठी जागा असेल.

इंजिनाशिवाय चालणारी ट्रेन

वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली इंजिन लेस ट्रेन आहे. लांबपल्ल्यांच्या गाड्यांना वेगळे इंजिन जोडावे लागते. इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत ही ट्रेन पाच तासांची प्रवास बचत करते.