VIDEO | बोटीची सुटका करताना वसईच्या समुद्रात JCB अडकला

| Updated on: May 04, 2021 | 12:09 PM

अचानक समुद्राला भरती आल्याने जेसीबीही पाण्यात रुतला आणि त्याच ठिकाणी अडकून पडला (Vasai Sea Beach JCB Drown)

VIDEO | बोटीची सुटका करताना वसईच्या समुद्रात JCB अडकला
वसईत समुद्रात जेसीबी बुडाला
Follow us on

वसई : वसईच्या खोल समुद्रात एक जेसीबी बुडाला आहे. समुद्रात अडकलेल्या बोटीची सुटका करण्यासाठी गेला असताना जेसीबीही पाण्यात अडकला. सुदैवाने जेसीबीच्या ड्रायव्हरची सुखरुप सुटका करण्यात यश आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Vasai Sea Beach JCB Drown in water)

सोमवारी दुपारच्या सुमारास पाचूबंदर किनाऱ्यावर असणारी एक बोट अचानक किनाऱ्यावरुन सुटली. बोट वाहत वाहत खोल समुद्रात गेली. वसई किनाऱ्या जवळील रानगाव आणि मर्सेसच्या दरम्यान समुद्रात बोट अडकली. भर समुद्रात अडकलेल्या बोटीला काढण्यासाठी हा जेसीबी त्या ठिकाणी गेला. मात्र अचानक समुद्राला भरती आल्याने जेसीबीही पाण्यात रुतला आणि त्याच ठिकाणी अडकून पडलेला आहे.

जेसीबी रुतला, चालक मात्र सुखरुप

सुदैवाने जेसीबी चालकाला सुखरूप बाहेर पडण्यात यश आलं आहे. अडकलेली बोटदेखील बाहेर आली आहे, मात्र आज जेसीबी अद्यापही पाण्यात आहे. समुद्राचं पाणी जेव्हा ओसरेल त्यावेळी हा जेसीबी बाहेर येऊ शकतो. बुडालेल्या जेसीबीचा व्हिडीओ समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ :

वसई समुद्रावर आधीही कार बुडाली

वसईतील भुईगाव समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटरवर खोल समुद्रात काही महिन्यांपूर्वी एक कार अडकली होती. कार पूर्णपणे समुद्रात बुडालेल्या अवस्थेत होती. फक्त तिचा वरचा टप आणि काच दिसत होती. कार समुद्रातील रेतीमध्ये फसल्याने तिला बाहेर काढणे कठीण जात होते.

पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान यांनी दिवसभर शर्थीचे प्रयत्न केले. अखेर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात यश आलं. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले होते. (Vasai Sea Beach JCB Drown in water)

उत्तन समुद्र किनाऱ्यावरील घटनेच्या आठवणी

मुंबईजवळील भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यावरही एक गाडी समुद्रात बुडाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. तरुणांच्या निष्काळजीमुळे हा प्रकार घडल्याचे समजते. हे तरुण स्कॉर्पिओ गाडीने उत्तन समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. समुद्रकिनारी आल्यानंतर तरुणांनी बिनाधास्त गाडी तिथेच पार्क केली आणि ते निघून गेले होते.

थोड्या वेळानंतर समुद्राला भरती आल्यामुळे गाडी समुद्राच्या पाण्यात बुडायला सुरुवात झाली. ही गोष्ट तेथील लोकांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी अग्शिशमन दलाला कळवले. अग्शिशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत ही गाडी समुद्रातून खेचून बाहेर काढली होती.

संबंधित बातम्या:

VIDEO | वसईच्या समुद्रात बुडालेली स्विफ्ट अखेर जेसीबीच्या मदतीने बाहेर

VIDEO | किनाऱ्यावर कार लावून फेरफटका महागात, भरती आल्यामुळे लाटेसोबत स्विफ्ट समुद्रात

(Vasai Sea Beach JCB Drown in water)