शाखेजवळ रडत बसलेल्या बापाला शिवसैनिकांची मोठी मदत, बंगालमधून बेपत्ता मुलीसोबत गाठभेट

| Updated on: Jan 12, 2021 | 6:08 PM

बंगाली मुलीच्या गरिबीचा फायदा उचलून तिला देहविक्री व्यवसायासाठी विकण्यात आले होते. (Vasai Shivsainik help to Daughter father meet)

शाखेजवळ रडत बसलेल्या बापाला शिवसैनिकांची मोठी मदत, बंगालमधून बेपत्ता मुलीसोबत गाठभेट
Follow us on

वसई : एक वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या बंगाली बाप लेकीची भेट घडवून आणण्यात वसईतील शिवसैनिकांना यश आले आहे. बंगाली मुलीच्या गरिबीचा फायदा उचलून तिला देहविक्री व्यवसायासाठी विकण्यात आले होते. (Vasai Shivsainik help to Daughter father meet)

कामाला लावतो हे आमिष दाखवत या मुलीला जवळच्या विरारमध्ये जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आले होते. वसई पोलिसांनी केलेल्या छापेमारीत ती मुलगी सापडली होती. त्यानंतर त्या मुलीची रवानगी बोईसर येथील रेस्क्यू आश्रमात करण्यात आली होती.

पण ही मुलगी कुठे आहे याचा तिच्या कुटुंबियांना काहीच पत्ता नव्हता. काही दिवसांनी ती मुलगी वसईत आहे, अशी माहिती तिच्या 60 वर्षीय मजूर बापाला मिळाली. मुलीला भेटण्यासाठी त्याने घरातील शेळ्या विकल्या आणि मिळालेल्या पैशातून वसई गाठली.

दिवसभराची बित्तंबात, पाहा आजची बात, #TV9Marathi वर दररोज रात्री 10 वा

वसईत आल्यानंतर वसई कोर्ट नाकावरील शिवसेनेच्या शाखेतील शिवालयात तो रडत बसला होता. ही घटना माजी नगरसेवक प्रवीण कांबळी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला.

 

वसई गाव शहरप्रमुख प्रथमेश राऊत, कोर्ट नाका शाखाप्रमुख दत्ता जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सीता जाधव, विभागप्रमुख राजा मोरे, शिवसैनिक यश कांबळे यांनी या मुलीचा शोध घेतला.

त्यानंतर रितसर न्यायालयीन प्रक्रिया करुन आज त्या पीडित मुलीला वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. तसेच या शिवसैनिकांनी या बाप-लेकींना हावडा मेलचे तिकीट काढून बंगालला सुखरूप रवानगी केली आहे. (Vasai Shivsainik help to Daughter father meet)

संबंधित बातम्या : 

अजूनही वेळ गेली नाही, केंद्र सरकारने वेळीच कायदे मागे घ्यावेत : नवाब मलिक

क्वारंटाईन सेंटरला दिलेलं सामान परतलंच नाही; टीव्ही, 4 हजार गाद्या आणि 8 हजार बेड गायब