Video : वर्ध्याच्या गोल मार्केट परिसरातील आगीत ‘राणी’नं पिलांना गमावलं, अंत्यसंस्कारावेळी मातृत्व गहिवरलं

| Updated on: Mar 01, 2021 | 12:35 AM

वर्ध्याच्या गोल बाजारात भाजी मंडीला आग लागली होती. त्या आगीत राणी नावाच्या कुत्रीच्या 6 पिलांचा जीव गेला. आपली पिलं कायमची दुरावल्याचं दु:ख राणीच्या डोळ्यात तिथं उपस्थित असलेल्या सर्वांनीच पाहिलं.

Video : वर्ध्याच्या गोल मार्केट परिसरातील आगीत राणीनं पिलांना गमावलं, अंत्यसंस्कारावेळी मातृत्व गहिवरलं
Follow us on

वर्धा : जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, आपल्या लेकराची ओढ केवळ माणसांनाच नसते. तर या पृथ्वीतलावरील प्रत्येक प्राणीमात्रात ती पाहायला मिळते. वर्धा शहरात याचाच प्रत्यत आला. पण जे काही घडलं त्यामुळे मग हेलावल्याशिवाय राहत नाहीत. वर्ध्याच्या गोल बाजारात भाजी मंडीला आग लागली होती. त्या आगीत राणी नावाच्या कुत्रीच्या 6 पिलांचा जीव गेला. आपली पिलं कायमची दुरावल्याचं दु:ख राणीच्या डोळ्यात तिथं उपस्थित असलेल्या सर्वांनीच पाहिलं.(6 puppies die in fire at Gol Bazaar in Wardha)

वर्धा शहरातील गोल बाजारात भाजी मंडीला आग लागली होती. या आगीत सुमारे 20 ते 25 दुकानं जळून खाक झाली. त्यातील एका दुकानाच्या शेजारी राणीनं आपल्या पिलांना जन्म दिला होता. पण दुर्दैवानं या आगीत राणीची 6 पिलं होरपळून मेली. डोळेही न उघडलेल्या पिलांचा मृत्यू राणीसाठी अत्यंत क्लेशदायी होता. तिला आपलं दु:ख व्यक्त करता येत नव्हतं. पण ते तिच्या डोळ्यात दिसत होतं. आग लागली तेव्हा परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्या गोंधळात या चिमुकल्या जिवांचा आवाज कुणाच्या कानीही पडला नाही. त्यामुळे त्या पिलांना वाचवणंही कुणाला शक्य झालं नाही.

संचारबंदीच्या काळात दुकानांना आग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा स्थितीत गोल बाजारातील दुकानांना अचानक आग लागली. या आगीमुळं दुकानदारांचंही मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली ते अद्याप समजू शकलेलं नाही. आग विझली तेव्हा काही शिल्लक राहिलं आहे का? हे पाहण्यासाठी तिथले दुकानदार पाहणी करत होते. त्यावेळी काहींना कुत्र्याची पिलं आगीत होरपळून मेल्याचं दिसलं आणि सर्वांचंच मन हेलावलं.

..आणि राणीलाही अश्रू अनावर झाले

आगीत होरपळून मेलेल्या पिलांवर तिथल्या दुकानदारांनी अंत्यसंस्कार केले. त्यावेळी आपल्या पिलाना कायमचं गमावल्याची भावना राणीचा मनात दाटत होती. जेव्हा दुकानदार पिलांवर अंत्यसंस्कार करत होते, तेव्हा राणी आसवं गाळत आपल्या पिलांना पाहत होती. त्या मुक्या जीवाला आपल्या भावना, दु:ख व्यक्त करता येत नव्हतं. पण तिचे अश्रू तिथं उपस्थित असलेल्या लोकांच्या मनाला चटका लावून जाणारे ठरले.

इतर बातम्या : 

वर्ध्यात 75 विद्यार्थ्यांना कोरोना, वसतिगृह सुरु करण्यावर प्रश्नचिन्ह

अमरावतीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, गुरुदेवनगरमधील बाजारपेठ बंदचे आदेश

6 puppies die in fire at Gol Bazaar in Wardha