Video : साताऱ्यातील विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास! उच्च न्यायालयाचा सलाम, सु-मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश

| Updated on: Jan 31, 2022 | 11:44 PM

शाळेत जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही मुली स्वत: होडी वल्हवून कोयना धरण पार करावं लागत असल्याचं चित्र पाहयला मिळालं. या चित्रामुळे सरकारच्या शिक्षण धोरणातील फोलपणा पुन्हा एकदा समोर आला. मात्र, अशा स्थितीतही मुली शिक्षण घेण्याच्या तीव्र इच्छेनं स्वत: होडीतून प्रवास करत असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानेही या मुलींना समाल ठोकलाय. तसंच उच्च न्यायालयाने रजिस्ट्रारला सु-मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Video : साताऱ्यातील विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास! उच्च न्यायालयाचा सलाम, सु-मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश
साताऱ्यातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
Follow us on

सातारा : एकीकडे ‘सारे शिकुया, पुढे जाऊया’ असं सरकार म्हणतं. त्यासाठी सर्व शिक्षा अभियानासारखे (Sarva Shiksha Abhiyan) महत्वाचे उपक्रम राबवले जातात. मात्र, शाळेत जाण्यासाठी किंबहुना शिक्षणाचा हक्क बजावण्यासाठी सातारा जिल्ह्यातील (Satara District) मुला-मुलींना होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची बातमी टीव्ही 9 मराठीने दाखवली होती. शाळेत जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही मुली स्वत: होडी वल्हवून कोयना धरण पार करावं लागत असल्याचं चित्र पाहयला मिळालं. या चित्रामुळे सरकारच्या शिक्षण धोरणातील फोलपणा पुन्हा एकदा समोर आला. मात्र, अशा स्थितीतही मुली शिक्षण घेण्याच्या तीव्र इच्छेनं स्वत: होडीतून प्रवास करत असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानेही (Mumbai High Court) या मुलींना समाल ठोकलाय. तसंच उच्च न्यायालयाने रजिस्ट्रारला सु-मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आजही जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो. जावली तालुक्यात खिरखंडी गावातील मुलींना शाळेत पोहोचण्यासाठी साठी आधी जंगलातून आणि नंतर स्वत: होडी चालवून कोयना धरणाचा विशाल जलाशय पार करत पलिकडच्या शाळेत जावं लागतं. याबाबत प्रसार माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आज न्यायमूर्ती प्रसन्ना वारळे आणि न्यायमूर्ती अनिल किल्लोर यांनी सु-मोटो याचिका दाखल करून प्रकरण संबंधित खंडपीठाकडे सादर करण्याच निर्देश मुंबई हायकोर्ट रजिस्ट्रारला दिले आहेत.

मुलींना शिक्षणासाठी योग्य वातावरण आवश्यक- हायकोर्ट

त्याचबरोबर न्यायालयाने असंही निरीक्षण नोंदविला आहे कि ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या घोषणेचा उद्देश साध्य करायचा असेल तर मुलींना शिक्षणासाठी योग्य वातावरण देणं आवश्यक आहे. ज्यामुळे या मुलींना सुरक्षितपणे शाळेत येण्या जाण्यासाठी सोईसुविधा उपलब्ध होणार आणि शिक्षणासाठी योग्य परिस्थिती निर्माण होईल.

कसा असतो मुलांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास?

सातारा जिल्ह्याच्या जावली तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पात खिरखंडी गावाचा समावेश होतो. या भागात सकाळी 9 वाजता शाळा सुरू होते. त्यासाठी सकाळी 8 वाजता गावातील मुली शाळेला जायला निघतात. त्यांचा हा प्रवास होडीनं सुरू होतो. सुमारे अर्धा तास वेगानं वाहणार्‍या वार्‍याचा सामना करत या मुली होडी चालवत कोयनेच्या दुसर्‍या तीरावर जातात. तिथे होडी थांबवून पुढे सुमारे 4 किलोमीटर काट्याकुट्यांतून आणि किर्र जंगलातून पायपीट करत दीड तासानंतर ‘अंधारी’ या गावात त्यांची शाळा आहे.

चित्रा वाघ यांचा सरकारवर निशाणा

माध्यमांमधून ही बातमी समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. ‘कोरोनाच्या भीतीनं आपण मुलांना शाळेत पाठवायला घाबरतोय आणि साता-यातील खिरखंडी गावातील हे विद्यार्थी होडीतून रोज कोयना धरण ओलांडत पुढे ४ किमी. जंगलातून चालत हिंस्त्र प्राण्यांचाही सामना करत जीवघेणा प्रवास करत आहेत. शिक्षणासाठीची यांची ही तळमळ संवेदनाहीन सरकारच्या संवेदना जागवेल का?’, असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे विचारला होता.

इतर बातम्या : 

नागपुरात रेशन धान्याचा मोठा काळाबाजाराचं रॅकेट, तिघांना अटक, तब्बल 12 टन रेशनाचा तांदूळही जप्त!

थेरगाव क्वीन’ची थेरं पाहून पालक चिंतेत! थेरगाव क्वीनला फॉलो करणारे ते 70 हजार रिकामटेकडे कोण?