बहनो और भाईयो, डिझेल के दाम बढ रहे है, क्या आपको पसंद है?; वडेट्टीवारांनी केली मोदींची नक्कल

| Updated on: Feb 05, 2021 | 12:36 PM

राज्यात भाजपने वीज दरवाढीच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. (vijay wadettiwar slams bjp over inflated power bills protests )

बहनो और भाईयो, डिझेल के दाम बढ रहे है, क्या आपको पसंद है?; वडेट्टीवारांनी केली मोदींची नक्कल
चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांधावर
Follow us on

नागपूर: राज्यात भाजपने वीज दरवाढीच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या या आंदोलनाची खिल्ली उडवतानाच त्यावर संतापही व्यक्त केला आहे. गॅस आणि इंधन दरवाढ करून वीज माफीसाठी आंदोलन करणं म्हणजे भाजपची दुटप्पी भूमिका आहे, असं सांगत वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करतच भाजपला फटकारले आहे. (vijay wadettiwar slams bjp over inflated power bills protests )

विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना मोदींची नक्कल करत भाजपवर टीका केली. बहनो और भाईओ, क्या डिझेल के दाम बढ रहे है वो आपको पसंद है? असं मोदी निवडणुकीपूर्वी म्हणत होते ना? आज डिझेलचे भाव काय आहेत? हे भाजपने सांगावं, असा सवाल करताना वडेट्टीवार यांनी थेट मोदींचीच नक्कल करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे वीज दरवाढीत सवलत दिली जात नाही म्हणून भाजप आंदोलन करतंय. दुसरीकडे आजच भाजपने गॅस सिलिंडरचे दर 25 रुपयाने वाढवले आहेत. त्यामुळे भाजपने आंदोलन करताना किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी, अशी टीकाही त्यांनी केली.

मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडलं

आज देशात डिझेलचे दर 85 रुपये आणि पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडलं असून कंबरडंही मोडलं आहे. इंधनाची दरवाढ करायची आणि वीज दरवाढीत सवलत द्या म्हणून तुणतुणं वाजवायचं हे कोणतं धोरण आहे? असा सवाल करतानाच आपण केलेल्या इंधन दरवाढीपासून दुसरीकडे लक्ष वळण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.

शिवसेनेची पाठराखण

शिवसेनेने इंधर दरवाढीविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचं विजय वडेट्टीवार यांनी समर्थन केलं. ज्यावेळी डिझेलचे भाव 54 रुपये होते. त्यावेळी आंदोलने झाली. आता हे दर 85 रुपये झाले असताना आंदोलने का करू नयेत? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. त्यावेळच्या तुलनेत आता कच्चा तेलाचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भावही कमी व्हायला हवेत. कच्चा तेलाचे भाव कमी असताना केंद्र सरकारने इंधन दरवाढीविरोधात कर रुपाच्या माध्यमातून 20 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. हा भाजपचा दुटप्पीपणाच नाही का? असा सवालही त्यांनी केला. (vijay wadettiwar slams bjp over inflated power bills protests )

राज्यांना खर्च नाहीत काय?

इंधन दरवाढ कमी करण्यासाठी राज्य सरकारने कर कमी करावेत अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीसांच्या या मागणीचाही त्यांनी समाचार घेतला. केंद्र सरकारने दर वाढवावेत आणि राज्याने कमी करावेत हा कुठला न्याय आहे? राज्याला खर्च नाही का? की फक्त केंद्रालाच खर्च असतो? तुम्ही दरवाढवत जाणार आणि राज्याने ते कमी करत जायचे हे लॉजिकच कळत नाही, असं सांगतानाच 2014च्या तुलनेत कच्चा तेलाचा भाव निम्म्याने कमी आहे. त्यामुळे इंधन दरवाढ त्या तुलनेत कमी झाली पाहिजे. विरोधी पक्षनेत्यांनी किमान भूमिका मांडताना त्याबाबत स्पष्टता मांडावी, असा टोलाही त्यांनी लगावला. (vijay wadettiwar slams bjp over inflated power bills protests )

 

संबंधित बातम्या:

राज्यपालांनी अंत पाहू नये; आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून अजित पवार संतापले

नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसनं उपमुख्यमंत्री करावं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी

धनंजय मुंडेंपाठोपाठ पंकजाही गहिनीनाथ गडावर जाणार, मुंडे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर

(vijay wadettiwar slams bjp over inflated power bills protests )