या अळीच्या काट्यात विषग्रंथी, डंख मारताच विषारी रसायने सोडते त्वचेत नि मग…

| Updated on: Sep 21, 2022 | 2:23 PM

काटा त्वचेमध्ये टोचल्यास अळी विषारी रसायन त्वचेमध्ये सोडते. त्यामुळं खूप आग होते. त्वचा लाल होणे, त्वचेचे रिॲक्शन, त्वचा सुजणे, डोळे लाल होणे, खूप आग होणे, ॲलर्जी अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात.

या अळीच्या काट्यात विषग्रंथी, डंख मारताच विषारी रसायने सोडते त्वचेत नि मग...
घोणस अळीचा डंख
Image Credit source: t v 9
Follow us on

विठ्ठल देशमुख

वाशिम परिसरात सध्या एका अळीनं शेतकऱ्यांमध्ये (farmers) भीती निर्माण केली. घोणस असं या अळीचं नाव सांगितलं जातं. या अळीनं चावा घेतल्यानंतर जखमा होतात. अॅलर्जी होते. त्वचेवर लालसर चट्टे येतात. प्रचंड आग होते. त्यामुळं रुग्णालयात भरती व्हावं लागत आहे. बहुभक्षीय विषग्रंथी (poison glands) असलेली घोणस अळी (डंख अळी) मंगरूळपीर व रिसोड तालुक्यात आढळली. शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चिंता वाढली आहे. या अळीने मानवाला डंख केल्यास त्वचेचे व इतर रिॲक्शन होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या अळीच्या व्यवस्थापनासाठी नेमक्या उपाययोजना काय कराव्या? याबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. या अळीच्या बारीक केसात काट्यात विषग्रंथी आहेत.

काटा त्वचेमध्ये टोचल्यास अळी विषारी रसायन त्वचेमध्ये सोडते. त्यामुळं खूप आग होते. त्वचा लाल होणे, त्वचेचे रिॲक्शन, त्वचा सुजणे, डोळे लाल होणे, खूप आग होणे, ॲलर्जी अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. दमा आजाराचा व्यक्ती अळीच्या संपर्कात आल्यास तीव्र प्रकारची लक्षणे दिसतात, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

वाशीम जिल्ह्यातील शेलूबाजार परिसरात जवळपास प्रत्येक गावातून घोणस अळी आढळत असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी माळशेलू येथील कविता चव्हाण या महिलेला या अळीचा स्पर्श झाल्याने तिला उपचारार्थ अकोला येथे दाखल केले.

त्यापूर्वी घोणस आळी येडशी येथे आढळून आली. इचा येथे सुध्दा एका युवकाला त्या अळीचा स्पर्श झाला. त्यामुळं त्या युवकाला उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.