थंडीच्या मोसमात पावसाची हजेरी, मुंबईसह काही ठिकाणी सरी, नोव्हेंबरमध्ये गेल्या 10 वर्षातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद

| Updated on: Dec 01, 2021 | 9:01 AM

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रझ येथील पर्जन्यमापकामध्ये 24.7 मिमी पावसाची नोंद नोव्हेंबर महिन्यात झाली आहेत. अधिकाऱ्यांनी अवकाळी पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.

थंडीच्या मोसमात पावसाची हजेरी, मुंबईसह काही ठिकाणी सरी, नोव्हेंबरमध्ये गेल्या 10 वर्षातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद
पाऊस
Follow us on

मुंबई: वातावरण बदलाचे (Climate Change) परिणाम वांरवार दिसून येत आहेत. गेल्या दशकभरातील आकडेवारीचा विचार केला असता नोव्हेंबर महिन्यातील (Rain in November) पावसाचं प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबर महिन्यात 30.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. 2019 मध्ये 109.3 मिमी पाऊस पडला होता. उर्वरित वर्षांमध्ये 5 मिमी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रझ येथील पर्जन्यमापकामध्ये 24.7 मिमी पावसाची नोंद नोव्हेंबर महिन्यात झाली आहेत. अधिकाऱ्यांनी अवकाळी पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. हवामान विभागानं पुढील काही दिवसांसाठी यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला असून त्याप्रमाणं मुंबईत पावासाला सुरुवात झाली आहे.

पालघर, नाशिक, धुळे नंदुरबारला ऑरेंज अ‌ॅलर्ट

भारतीय हवामान विभागानं हवामानाचा अंदाज जारी केला असून पालघर, नाशिक, धुळे नंदुरबारला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

3 डिसेंबरपर्यंत हलक्या सरी कोसळ्याचा अंदाज

राज्यातील काही भागात 3 डिसेंबरपर्यंत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा इशारा आयएमडीनं दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं पावसाची शक्यता निर्माण झालीय. महाराष्ट्रात आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, धूळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

वसई विरारमध्ये काही भागात हलक्या सरी

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पहाटे पासूनच परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज वसई विरारच्या काही भागात हलका पाऊस पडत आहे. नालासोपारा पूर्व संयुक्त नगर परिसरात पावसानं हजेरी लावली.

इतर बातम्या:

Weather Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, IMD कडून यलो ॲलर्ट जारी

Weather Update | पुण्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता, मुंबईसह 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट

 

Weather Forecast imd record november rain second highest in 10 years IMD issue orange to Palghar Nashik Dhule Nandurbar