AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, IMD कडून यलो ॲलर्ट जारी

राज्यात येत्या 2 तारखेपर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.

Weather Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, IMD कडून यलो ॲलर्ट जारी
weather (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 7:50 AM
Share

मुंबई: भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार 30 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत 1 डिसेंबरलाला पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, त्याचा प्रभावी राज्यात काही ठिकाणी होण्याची शक्यता असल्यानं 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत मेघगर्जनेसह,जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी हलका पाऊस ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस

राज्यात येत्या 2 तारखेपर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.

के. एस. होसाळीकर यांचं ट्विट

विविध जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी

हवामान विभागानं 30 नोव्हेंबरसाठी ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक आणि अहमदगर, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, उस्मानाबद, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे. यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला नसला तरी पुणे, सोलापूर, जळगाव जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

1 डिसेंबर: रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, अहमदनगर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

2 डिसेंबर: रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जालना या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये

वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटरवर पोहोचण्याची शक्यता असल्यानं 1 आणि 2 डिसेंबरला दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या तर 2 आणि 3 डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या समुद्रात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये,असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतही पाऊस

भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला मुंबईत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

इतर बातम्या:

Weather Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्रात 29,30 तारखेला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, IMD कडून यलो अलर्ट जारी

चांगली बातमी: औरंगाबादमध्ये सी बँड डॉपलर रडार बसवणार, डाटा 24 तास उपलब्ध असावा, हवामान तज्ज्ञांची विनंती!

Weather Forecast imd rains predicted unseasonal rain on 30 November to 2 December at kokan and central Maharashtra and Marathwada

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.