Special Report : गेवराईमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत नेमकं काय घडलं?, व्हायरल व्हिडीओवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले स्पष्टीकरण

| Updated on: Jan 21, 2023 | 11:13 PM

पंकजा मुंडे आणि भाजपला बदनाम करण्याचं एक युनिट भाजपमध्येच असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलंय. कालच्या प्रवासात पंकजाताई माझ्यानंतर बोलल्या. मी त्यांना प्रथम स्थान दिलं.

Special Report : गेवराईमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत नेमकं काय घडलं?, व्हायरल व्हिडीओवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले स्पष्टीकरण
Follow us on

मुंबई : बीडच्या गेवराईमध्ये काल भाजपची सभा झाली. सभेत पंकजा मुंडे या भाषण करण्यासाठी उभ्या राहिल्या. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना नाही म्हणून उत्तर दिलं. असा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओवरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. व्हायरल व्हिडीओनुसार, पंकज मुंडे म्हणतात, आधी मी बोलते ना. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाही म्हटलं. त्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, दोनच मिनिटं बोलते. त्यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाही म्हटलं. शेवटी पंकजा मुंडे या आपल्या जागेवर बसल्या.

यावर काही लोकं जाणूनबुजून वातावरण खराब करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. विशेष म्हणजे ज्यांनी हा व्हिडीओ शूट करून व्हायरल केला. त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्याचं बावनकुळे यांनी म्हटंलय.

पंकजा मुंडे आणि भाजपला बदनाम करण्याचं एक युनिट भाजपमध्येच असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलंय. कालच्या प्रवासात पंकजाताई माझ्यानंतर बोलल्या. मी त्यांना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे.

पंकजाताई या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळं त्यांना नंतर बोला. मी आधी बोलतो, असं मला म्हणायचं होतं, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.

नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला. भाजप हा बहुजन विरोधी पक्ष आहे. ओबीसी विरोधी आहे. ओबीसींची मतं घेणं आणि ओबीसींच्या नेतृत्वाला दाबणं ही भाजपची मानसिकता राहिल्याचं स्पष्ट होतं, असं नाना पटोले म्हणाले.

भाजप नेहमी दुसऱ्यांची घरं फोडतो. त्यामुळं त्यांचं घर फुटलं म्हणजे दुसऱ्याची घरं फोडण्याचं दुःख त्यांना कळेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.