Special Report : शिवसेना कुणाच्या हाती जाणार?; संजय राऊत म्हणतात, “निवडणूक आयोगावर…”

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या १६ आमदार अपात्र ठरविण्याची शक्यता जास्त असल्याचं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांना वाटतं. म्हणून निवडणूक आयोगानं निर्णय देण्याची घाई करू नये, असंही त्यांच मत आहे.

Special Report : शिवसेना कुणाच्या हाती जाणार?; संजय राऊत म्हणतात, निवडणूक आयोगावर...
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 10:42 PM

मुंबई : शिवसेना कुणाची यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात युक्तिवाद संपला. ३० जानेवारीला आता आयोग निकाल देण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगावर दबाव असल्याचं संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण झालाय. सोमवारी दोन्ही गटाला लिखित युक्तिवाद सादर करायचा आहे. ३० तारखेच्या सुनावणीत थेट निकालचं येण्याची शक्यता आहे. शिवसेना आमचीच असा दावा ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांनी केला आहे.

ठाकरे यांची कार्यकारिणी घटनेप्रमाणे असून ती बरखास्त होऊ शकत नाही, असं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले. पक्ष संघटनात्मक संख्याबळ आणि आमदार-खासदार वेगळे आहेत, असंही ठाकरे गटाचे म्हणणं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूटच पडली, असा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. लोकसभा, विधानसभेचे सदस्य पाहता चिन्ह आम्हालाचं द्या, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केलाय.

जे काही कायद्यानुसार आणि नियमानुसार व्हावं, अशी आमची अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ३० जानेवारीला निवडणूक आयोग शिवसेना आणि धनुष्यबाणाचा निकाल सुनावणार की, खंडपीठाकडून अपात्रतेचा निकाल येईपर्यंत आयोग निकाल राखून ठेवणार असा प्रश्न आहे.

एखाद्या पक्षात फूट पडली, तर कोणत्या गटाला मान्यता द्यायची हे निवडणूक आयोग ठरविते. पण, सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. निकाल लावण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाकडे आहे.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या १६ आमदार अपात्र ठरविण्याची शक्यता जास्त असल्याचं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांना वाटतं. म्हणून निवडणूक आयोगानं निर्णय देण्याची घाई करू नये, असंही त्यांच मत आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.