‘तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं, खिडकी काय दरवाजे उघडले तरी…’, संजय राऊतांचा हल्लाबोल
'खिडकी काय, मोदींनी असे दरवाजे उघडले तरी काहीच फरक पडत नाहीत, आम्ही त्यासमोर उभं राहणार नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात अजून शिल्लक आहे, असेही राऊत म्हणाले. ते जर असं करत असतील तर याचा अर्थ एकच की मोदींना बहुमत मिळत नाहीये, त्यांचा पराभव होतोय', राऊतांचा मोदींवर निशाणा
उद्ध्व ठाकरे अडचणीत असतील तर त्यांना मदत करणारी पहिली व्यक्ती मीच असेन, असं वक्तव्यही मोदी यांनी केलं. ते उद्धव ठाकरेंसमोर एक खिडकी उघडत आहेत का? असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट उत्तर दिलं. खिडकी काय, मोदींनी असे दरवाजे उघडले तरी काहीच फरक पडत नाहीत, आम्ही त्यासमोर उभं राहणार नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात अजून शिल्लक आहे, असेही राऊत म्हणाले. ते जर असं करत असतील तर याचा अर्थ एकच की मोदींना बहुमत मिळत नाहीये, त्यांचा पराभव होतोय हे दिसंतय म्हणून ते अशा फटी, दरवाजे शोधत आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. मोदी, शहा, अडचणीत आहेत, त्यामुळे असे बोलत आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली. पुढे ते असेही म्हणाले, मोदींचं बाळासाहेबांवर एवढं प्रेम असतं तर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना अशा प्रकारे फोडली नसती. इतकंच काय तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नावं एका बेईमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं, त्यांचा धनुष्यबाण हे चिन्ह एका बेईमान व्यक्तीच्या हातावर ठेवलं नसतं, अशा घणाघातही राऊत यांनी केलाय.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

