Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

| Updated on: May 03, 2024 | 5:16 PM

अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा भीषण अपघात झाला असून या घटनेत आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पातूर शहराजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा जागीच मृत्यू झाला आहे

आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा भीषण अपघात झाला असून या घटनेत आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पातूर शहराजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (वय २८) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शिवाजी आमले (वय ३०) सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय ३५), तसेच एका नऊ महिन्यांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहे. त्यात पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे.

Published on: May 03, 2024 05:16 PM