देशात मिनी लॉकडाऊन लागणार? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, सध्या तरी देशात…

Supriya Sule : देशात लॉकडाऊन तर लागणार नाही ना असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.

देशात मिनी लॉकडाऊन लागणार? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, सध्या तरी देशात...
supriya sule big statement on india fuel crisis
Image Credit source: Google
| Updated on: May 30, 2026 | 5:52 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अनेक देशांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. भारतातही इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनलेता अनावश्यक खर्च, प्रवास आणि सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे देशात लॉकडाऊन तर लागणार नाही ना असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. अशातच आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

भारतात मिनी लॉकडाऊन लागणार?

भारतात गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किमतीत वाढ होताना पहायला मिळत आहे. यावर सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, माझी आणि राहुल गांधी यांची सगळी भाषण काढा. वारंवार ही परिस्थिती होणार आहे असं सातत्याने आम्ही सांगत आलो आहे. पुढे सुळे यांना मिनी लॉकडाऊनबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी मिनी लॉकडउनची शक्यता देशात सध्या तरी नाही असं विधान केलं आहे.

संकट टळल्यानंतर इंधनाचे दर कमी होणार – मुख्यमंत्री फडणवीस

इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आम्हा सगळ्यांना माहित आहे की जगात ऊर्जेचं संकट आहे. तेलाचे संकट सगळीकडे आहे, जगातील सर्वच देशात दर वाढलेले आहेत, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात दर वाढलेले आहेत. आपल्याला सप्लाय चैन मेंटेन करायची असेल तर जास्त पैसे द्यावे लागता. एकदा हे संकट टळलं की पुन्हा दर कमी होतील.

दरम्यान, गेल्या काही काळापासून पेट्रोल-डिझेल किमतीत वाढ झाली आहे. तसेच सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे ही वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढला आहे. अनेकांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे अनेकांनी या दरवाढीचा निषेध केला आहे.

Follow Us