Gold price today: सोन्याच्या भावात घसरण, दोन महिन्यांत सर्वाधिक स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

| Updated on: Jan 07, 2022 | 5:06 PM

वर्ष 2020-21 मध्ये कोविड प्रादूर्भाव अद्याप घटलेला नाही. लग्नसोहळा रद्द होणे तसेच सार्वजनिक सोहळ्यातील निर्बंधामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली होती. मात्र, वर्ष 2021 मध्ये परिस्थिती निवळल्यानंतर सोन्याची मागणी वाढली. त्यामुळे विक्रमी निर्यात करण्यात आली.

Gold price today: सोन्याच्या भावात घसरण, दोन महिन्यांत सर्वाधिक स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा मौल्यवान धातूंच्या किंमतीवर परिणाम दिसून आला आहे. अमेरिका बाँड यील्ड (U.S. Bond Yield) वर मिळणाऱ्या व्याजदरात वाढीमुळे सोन्याच्या किंमतीच चढ-उतार होत आहे. आज (शुक्रवारी) MCX वर डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याचा भाव (Gold Rate) गेल्या दोन महिन्यांतील भावाच्या तुलनेत नीच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार फेडद्वारे व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. डॉलरचे मूल्य वधारले आहे.

MCX वर फेब्रुवारीला डिलिव्हरी होणारे सोने 81 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 47370 रुपयांच्या भावाने ट्रेड होत आहे.एप्रिल डिलिव्हरी सोने 42 रुपयांच्या घसरणीसह 47534 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर ट्रेड होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1780 डॉलरच्या स्तरावर ट्रेडिंग होत आहे.

चांदीतही घसरण

सोन्यासह चांदीच्या भावातही घसरण सुरू आहे. MCX वर मार्च डिलिव्हरी चांदी 190 रुपयांच्या घसरणीसह 60236 रुपये प्रति किलोग्रॅम स्तरावर ट्रेड होत आहे. मे डिलिव्हरीच्या चांदीत 226 रुपयांच्या घसरणीसह 60900 रुपये प्रति किलोग्रॅम स्तरावर ट्रेड होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी घसरणीसह 22.23 डॉलर प्रति औंस प्रमाणे व्यापार केला जात आहे.

बाँड यील्ड आणि डॉलर इंडेक्समध्ये घसरण

10 वर्षांचा अमेरिकी बाँड यील्ड सध्या 0.57 टक्क्यांच्या घसरणीसह 1.723 टक्क्यांवर पोहोचला होता. तसेच डॉलर इंडेक्स मध्ये चढ-उताराचे चित्र आहे. 0.18 टक्के घसरणीसह 96.150 अंकांच्या स्तरावर होता. जगातील प्रमुख सहा चलनाच्या तुलनेत डॉलरची मजबूती या इंडेक्स वरुन दिसून येत आहे.

भारताची विक्रमी निर्यात

वर्ष 2021 मध्ये भारताने विक्रमी सोन्याची निर्यात केली. रॉयटर्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी भारताने 55.7 बिलियन डॉलर सोन्याची निर्यात केली. वर्ष 2020 मध्ये एकूण 22 बिलियन डॉलर किंमतीच्या सोन्याची निर्यात केली होती. वर्ष 2011 मध्ये एकूण 53.9 बिलियन डॉलर किंमतीच्या सोन्याची निर्यात करण्यात आली होती.

वर्ष 2020-21 मध्ये कोविड प्रादूर्भाव अद्याप घटलेला नाही. लग्नसोहळा रद्द होणे तसेच सार्वजनिक सोहळ्यातील निर्बंधामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली होती. मात्र, वर्ष 2021 मध्ये परिस्थिती निवळल्यानंतर सोन्याची मागणी वाढली. त्यामुळे विक्रमी निर्यात करण्यात आली.

सोन्याची मागणी कायम

कमोडिटी मार्केटच्या अभ्यासकांच्या मते, ओमिक्रॉन व्हेरियंट निवळल्यानंतर सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने आयत शुक्ला केलेल्या कपातीमुळे मागणीत वाढ होण्याचा अंदाज आहे.

इतर बातम्या :

‘पंजाबमध्ये जीवाला धोका असल्याचं सांगणं हा राज्याचा अपमान’, नवज्योतसिंह सिद्धू यांचा भाजपवर निशाणा

Fadnavis| आपल्याच सुनेच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती विद्या चव्हाण, ‘डान्सिंग डॉल’वर अमृता फडणवीसांचं सणसणीत उत्तर