‘पंजाबमध्ये जीवाला धोका असल्याचं सांगणं हा राज्याचा अपमान’, नवज्योतसिंह सिद्धू यांचा भाजपवर निशाणा

'पंजाबमध्ये जीवाला धोका असल्याचं सांगणं हा राज्याचा अपमान', नवज्योतसिंह सिद्धू यांचा भाजपवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवज्योत सिद्धू

रस्ते मार्गानं जाण्याचं नियोजन अचानक का करण्यात आलं? फिरोजपूरमध्ये होणाऱ्या रॅलीसाठी लोकांची गर्दी नव्हती. त्यामुळेच हे संपूर्ण नाटक रचण्यात आलं. 70 हजार खुर्च्या आणि फक्त 500 लोक होते. पंजाबमध्ये भाजपला समर्थक नाहीत. पंजाबमध्ये भाजप पूर्णपणे उघडी पडली असल्याची घणाघाती टीका सिद्धू यांनी केलीय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 07, 2022 | 4:53 PM

नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीनंतर (PM Narendra Modi Security Breach) राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांकडून सातत्यानं पंजाब सरकार (Punjab Government) आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवण्यात येतोय. या प्रकरणी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू (Navjyot singh Sindhu) यांनी चंदीगढमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी सिद्धू यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. पंजाबमध्ये जीविताला धोका असल्याचं सांगणं हा राज्याचा अपमान असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय.

सिंद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्ते मार्गानं जाण्याचं नियोजन अचानक का करण्यात आलं? फिरोजपूरमध्ये होणाऱ्या रॅलीसाठी लोकांची गर्दी नव्हती. त्यामुळेच हे संपूर्ण नाटक रचण्यात आलं. 70 हजार खुर्च्या आणि फक्त 500 लोक होते. पंजाबमध्ये भाजपला समर्थक नाहीत. पंजाबमध्ये भाजप पूर्णपणे उघडी पडली असल्याची घणाघाती टीका सिद्धू यांनी केलीय.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावरही निशाणा

पंजाबमध्ये लोकांनी भाजपला नाकारले आहे. भाजपनं घाणेरडं राजकारण आता बंद केलं पाहिजे. आयबी, सेंट्रल एजन्सी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चुकीला जबाबदार नाहीत का? असा सवाल त्यांनी केलाय. तसंच राजधानी दिल्लीमध्ये शेतकरी दीड वर्षे आंदोलन करत होते. तेव्हा शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला पण हिंसा झाली नाही’, असंही सिद्धू म्हणाले. यावेळी सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावरही निशाणा साधला. अमरिंदर सिंह हे भाजपचे पोपट आहेत आणि ते भाजपच्या पिंजऱ्यात कैद आहेत, अशा शब्दात सिद्धू यांनी अमरिंदर सिंहांवर टीका केलीय.

‘भाजपनं आता राजकारण करणं बंद केलं पाहिजे. येथे तुम्हाला उत्तर मिळेल. पंजाबमध्ये राष्ट्रपती शासनाचा मुद्दा उपस्थित करणारे तुमचे (भाजपचे) पोपट आहेत’, अशी टीका सिद्धू यांनी केलीय. पंतप्रधान महोदय तु्म्ही केवळ भाजपचे नाही तर सर्वांचे पंतप्रधान आहात. तुमच्या जीविताची किंमत देशातील प्रत्येक लहान मुलही जाणतं. पंजाबमध्ये जीविताला धोका असल्याचं तुम्ही म्हणालात. हा या राज्याचा पंजाबियतचा अपमान आहे, असंही सिद्धू म्हणाले.

पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?

पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केला.

इतर बातम्या :

Fadnavis| आपल्याच सुनेच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती विद्या चव्हाण, ‘डान्सिंग डॉल’वर अमृता फडणवीसांचं सणसणीत उत्तर

Gautam Gambhir: ‘स्टार प्लेयरसाठी त्याच्यावर अन्याय करु नका’, गौतम गंभीरचा टीम इंडियाला इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें