Gautam Gambhir: ‘स्टार प्लेयरसाठी त्याच्यावर अन्याय करु नका’, गौतम गंभीरचा टीम इंडियाला इशारा

"कसोटीमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही. अजिंक्य रहाणेसारखा त्याला सुद्धा पाठिंबा मिळाला पाहिजे" असं गंभीरने म्हटलं आहे.

Gautam Gambhir: 'स्टार प्लेयरसाठी त्याच्यावर अन्याय करु नका', गौतम गंभीरचा टीम इंडियाला इशारा
Gautam Gambhir
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 4:25 PM

नवी दिल्ली: जोहान्सबर्ग कसोटीत अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने संघाला गरज असताना अर्धशतक झळकावली. हा सामना त्यांच्या करीयरच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा होता. कारण पुन्हा अपयशी ठरले असते, तर दोघांना संधी मिळण्याची शक्यता धुसर होती. अजिंक्यची (58) आणि पुजाराच्या (53) धावांच्या खेळीच्या बळावर भारताला दुसऱ्याडावात 266 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली. पुजाराने 86 चेंडूत 53 तर अजिंक्यने 76 चेंडूत 56 धावा केल्या. (India vs South Africa Dont be unfair for star player gautam Gambhir warns team india)

तर तो त्याच्यावर अन्याय ठरेल “कॅप्टन विराट कोहली जायबंदी झाल्याने त्याच्या जागेवर खेळणाऱ्या हनुमा विहारीने दुसऱ्याडावात नाबाद 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली व तळाच्या फलंदाजांसोबत भागीदाऱ्या रचल्या. आता पुढच्या कसोटीमध्ये विराट कोहली खेळू शकतो. तो सराव करत असल्याचे फोटो समोर आले आहेत. विराट संघात परतल्यानंतर हनुमा विहारीला बाहेर बसवलं, तर तो त्याच्यावर अन्याय ठरेल” असं भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे.

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही “कसोटीमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हनुमा विहारीला पुरेशी संधी मिळालेली नाही. अजिंक्य रहाणेसारखा त्याला सुद्धा पाठिंबा मिळाला पाहिजे” असं गंभीरने म्हटलं आहे. मागच्यावर्षभरापासून खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या अजिंक्य रहाणेला अनेक चान्स देण्यात आले आहेत. “विहारीला पुढच्याकसोटीत संधी मिळाली नाही, तर ते दुर्देवी ठरेल. अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावलं, असेल तर हनुमा विहारी सुद्धा 40 धावांवर नाबाद आहे. दुसऱ्याडावात विहारीने रहाणेच्या जागी बॅटिग केली असती, तर त्याने सुद्धा अर्धशतक झळकावलं असतं” असं गंभीर स्टार स्पोटर्सवर म्हणाला.

“आपण बऱ्याचकाळापासून रहाणेची कामगिरी बघतोय. पुढच्या कसोटीत विराट कोहली संघात परतेल, त्यावेळी त्याने चौथ्या आणि विहारीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी, ते योग्य दिशेने उचललेलं पाऊल ठरेल” असे गंभीर म्हणाला. “जोहान्सबर्ग कसोटीच्या दोन्ही डावात हनुमा विहारीने चांगली कामगिरी केली. त्यामुळे केपटाऊन कसोटीत संघात त्याला स्थान मिळाले पाहिजे. संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणेला इतका पाठिंबा दिला असेल, तर आता त्यांनी हनुमा विहारीवर विश्वास दाखवावा” असे गंभीर म्हणाला.

संबंधित बातम्या: 

बदली झाली आणि कलेक्टरनं बोऱ्या बिस्तर सगळा स्वत: गुंडाळला, का होतेय IAS ची देशभर चर्चा? आपल्याच सुनेच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती विद्या चव्हाण, ‘डान्सिंग डॉल’वर अमृता फडणवीसांचं सणसणीत उत्तर 86 व्या वर्षी वडिलांनी मॅरेज ब्युरोत नाव नोंदवलं, पुण्यात पोराने बापालाच संपवलं

(India vs South Africa Dont be unfair for star player gautam Gambhir warns team india)

Non Stop LIVE Update
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.