20 महिन्यांच्या धनिष्ठाने पाच जणांना नवं जीवन देऊन घेतला जगाचा निरोप, बनली यंगेस्ट कॅडेवर डोनर

| Updated on: Jan 14, 2021 | 3:50 PM

तिने हे जग सोडण्यापूर्वी पाच जणांना एक नवीन जीवन देवून त्यांच्या आयुष्यात आनंद पसरवला. धनिष्ठा सर्वात कमी वयाची कॅडेवर डोनर ठरली आहे

20 महिन्यांच्या धनिष्ठाने पाच जणांना नवं जीवन देऊन घेतला जगाचा निरोप, बनली यंगेस्ट कॅडेवर डोनर
Follow us on

नवी दिल्ली : लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, असं म्हणतात (Youngest Cadaver Donor). लहान मुलं हे नेहमीच आपल्या आयुष्यात आनंद घेवून येतात. ही गोष्ट एका 20 महिन्यांच्या चिमुकलीने खरी करुन दाखवली आहे. धनिष्ठा (Dhanistha) नावाची ही 20 महिन्यांची मुलगी आता आपल्यात नाही. पण, तिने हे जग सोडण्यापूर्वी पाच जणांना एक नवीन जीवन देवून त्यांच्या आयुष्यात आनंद पसरवला. धनिष्ठा सर्वात कमी वयाची कॅडेवर डोनर ठरली आहे (Youngest Cadaver Donor).

डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर आई-वडिलांचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार 20 महिन्यांची ही चिमुकली 8 जानेवारीला रोहिण येथील तिच्या रहात्या घरी खेळत असताना टेरेसवरुन खाली पडली. खाली पडल्याने तिच्या डोक्याला मार लागून ही बेशुद्ध झाली. त्यानंतर घरच्यांनी तात्काळ तिला दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी धनिष्ठाला शुद्धीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण, सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. डॉक्टरांनी 11 जानेवारीला मुलीला ब्रेन डेड घोषित केलं.

धनिष्ठाच्या अवयव दानाने पाच जणांना नवीन जीवन मिळालं

या चिमुकलीचा ब्रेन डेड होता. पण, शरीरातील इतर सर्व अवयव व्यवस्थितपमे कार्य करत होते. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी तिचे अवयव दान करण्याचं ठरवलं. त्यानंतर धनिष्ठाचं हृदय, यकृत, दोन्ही किडनी आणि कॉर्निया (डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा) वेगवेगळ्या रुग्णांमध्ये त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यामुळे त्या लोकांना जीवनदान मिळाले (Youngest Cadaver Donor).

जाण्यापूर्वी पाच घरांमध्ये आनंद पसरवला

लहान मुलं नेहमी प्रेमळ असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून घरामध्ये आनंदाचं वनातावरण पसरतं. पण, धनिष्ठाच्या आई-वडिलांनी एक साहसी काम केलं. धनिष्ठाच्या पाच अंगांमुळे पाच घरात आज आनंदाचं वातावरण आहे.

Youngest Cadaver Donor

संबंधित बातम्या :

नाशिकमधील धक्कादायक प्रकार, अवघ्या 3 महिन्यांच्या बाळाला गटाराच्या कडेला फेकलं

“माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्या”, बाळांच्या आई आणि नातेवाईकांची आर्त हाक