Jammu Kashmir: श्रीनगरमध्ये 29 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या
रात्री आठच्या सुमारास, पोलिसच कॉन्स्टेबल तौसिफ अहमद यांच्या घराजवळ दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि उपचारासाठी एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये रविवारी संध्याकाळी एका 29 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तौसिफ अहमद असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, ही घटना श्रीनगरमधील बटमालू भागात घडली. परिसराचात नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. (29 year old Jammu Kashmir policeman killed by terrorists in Shrinagar)
अधिकाऱ्यांनी सांगितले, रात्री आठच्या सुमारास, एसडी कॉलनी, बटामालू येथील जम्मू आणि काश्मीर पोलिसचे कॉन्स्टेबल तौसिफ अहमद यांच्या घराजवळ दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि उपचारासाठी एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सने (NC) या हल्ल्याचा निषेध केला आहे. पक्षाने ट्विट केले, श्रीनगरच्या बाटमालू येथे 29 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही स्पष्टपणे निषेध करतो. निंदा करायला शब्द पुरेसे नाहीत.
यापूर्वी, ऑक्टोबरमध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी 11 नागरिकांची हत्या केली होती. ज्यामध्ये एका शिक्षकाचा, इतर राज्यातील मजूरांचा आणि दुकानदारांचा समावेश होता.
रविवारी शोपियान जिल्ह्यातील रुग्णालयातून ‘द रेझिस्टन्स फ्रंट’च्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, टीआरएफचा सक्रिय दहशतवादी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोहेल अहमद लोन असे या दहशतवाद्याचे नाव असून तो शोपियानच्या हरमेन भागातील रहिवासी आहे. दहशतवाद्याच्या मानेवर गोळीचा घाव आहे. त्याच्या ही दुखाप कशी झाली त्याचा पोलीस तपास करत आहेत.
Other News