मोठी बातमी! देशात आणखी एक विमान अपघात, जमिनीवर आदळताच पेट, अनेकांच्या मृत्यूची भीती

Plane Crash : छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील नारायणपूर परिसरातील आरा डोंगराजवळ एका खासगी विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

मोठी बातमी! देशात आणखी एक विमान अपघात, जमिनीवर आदळताच पेट, अनेकांच्या मृत्यूची भीती
Plane Crash
Image Credit source: Google
| Updated on: Apr 20, 2026 | 4:40 PM

भारतात आणखी एक विमान अपघात झाला आहे. छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील नारायणपूर परिसरातील आरा डोंगराजवळ एका खासगी विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होण्यास सुरुवात केली आहे. या विमान अपघातानंतरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात विमान कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर पहायला मिळत आहे. त्यामुळे या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विमानाची डोंगराला धडक

समोर आलेल्या माहितीनुसार हे खासगी विमान एका डोंगराला धडकलं. यानंतर या विमानाला भीषण आग लागली. या अपघातानंतर मोठ्या ज्वाळा आणि धूर आकाशात पसरताना दिसला, ज्यामुळे आसपासच्या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. ज्या ठिकाणी हे विमान कोसळले हो भाग दुर्गम आणि डोंगराळ आहे. या ठिकाणी पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे मदत आणि बचावकार्यामध्ये अडचणी येत आहेत, मात्र तरीही प्रशासनाची पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रवाशांबाबत माहिती नाही

या विमानातून किती प्रवासी प्रवास करत होते, याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. प्रशासन सध्या हे विमान कुठे जात होते? याबाबतची माहिती गोळा करत आहे. परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच अचूक आकडेवारी आणि संपूर्ण माहिती जाहीर केली जाईल अशी माहिती जारी केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी रवाना

या विमान अपघाताची माहिती समोर येतात स्थानिक पोलिस आणि प्रशासनाची पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली आहेत. वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. लाल उम्मेद सिंह देखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि बचावकार्याचे निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. प्रशासनाने मदत आणि बचावकार्य जलदगतीने सुरू करण्याची तयारी केली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन पथके तैनात केली जात आहेत. सध्या अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही.

तपास सुरू

या अपघाताबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघाताची गंभीरता लक्षात घेऊन सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे. या अपघाताबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर येताच ती तात्काळ सार्वजनिक केली जाईल. सध्या घटनास्थळ आणि आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

 

Follow Us