एअर इंडियाच्या प्रत्येक घोषणेनंतर ‘जय हिंद’ ऐकायला येणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:21 PM

मुंबई : ‘एअर इंडिया’ या सरकारी विमान वाहतूक कंपनीच्या विमानात आता तुम्हाला प्रत्येक घोषणेनंतर ‘जय हिंद’ ऐकायला मिळणार आहे. तसे आदेश एअर इंडियाने सर्व केबिन क्रू आणि कॉकपिट क्रूला दिले आहेत. त्यामुळे आता एअर इंडियाच्या प्रत्येक विमान प्रवासादरम्यान कुठलीही घोषणा केल्यानंतर केबिन क्रू आणि कॉकपिट क्रूला ‘जय हिंद’ म्हणावे लागणार आहे. “प्रत्येक घोषणेनंतर थोडा विराम घेत […]

एअर इंडियाच्या प्रत्येक घोषणेनंतर ‘जय हिंद’ ऐकायला येणार
Follow us on

मुंबई : ‘एअर इंडिया’ या सरकारी विमान वाहतूक कंपनीच्या विमानात आता तुम्हाला प्रत्येक घोषणेनंतर ‘जय हिंद’ ऐकायला मिळणार आहे. तसे आदेश एअर इंडियाने सर्व केबिन क्रू आणि कॉकपिट क्रूला दिले आहेत. त्यामुळे आता एअर इंडियाच्या प्रत्येक विमान प्रवासादरम्यान कुठलीही घोषणा केल्यानंतर केबिन क्रू आणि कॉकपिट क्रूला ‘जय हिंद’ म्हणावे लागणार आहे.

“प्रत्येक घोषणेनंतर थोडा विराम घेत आणि संपूर्ण उत्साहाने प्रत्येकाने ‘जय हिंद’ म्हणणे अनिवार्य आहे. याची तातडीने दखल घेण्यात यावी”, असे आदेश एअर इंडियाने काढलेल्या पत्रकात देण्यात आले आहेत. एअर इंडियामध्ये सध्या 3500 केबिन क्रू आणि 1200 कॉकपिट क्रू आहेत.

अश्वनी लोहानी यांनी पुन्हा एकदा एअर इंडियाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकाची धुरा सांभाळल्यानंतर हे पत्रक काढण्यात आलं. विशेष म्हणजे अश्वनी लोहानी यांनी 2016 सालीही त्यांच्या कार्यकाळात अशाच प्रकारचे पत्रक काढले होते.

एअर इंडिया ही भारताची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो आणि जेट एअरवेज खालोखाल एअर इंडिया भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. ती भारतभर आणि जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी आणि मालवाहतूक विमानसेवा चालवते. एअर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे विमानतळ आहेत.