All is not Well in Ladakh असे म्हणत या प्रसिद्ध व्यक्तीने दिला उपोषणाचा इशारा

| Updated on: Jan 23, 2023 | 9:30 AM

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या लडाखला संरक्षण देण्याची मागणी करण्यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनाला लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. कोण आहेत सोनम वांगचुक वाचा

All is not Well in Ladakh असे म्हणत या प्रसिद्ध व्यक्तीने दिला उपोषणाचा इशारा
sonamWangchuk
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लडाखमध्ये ऑल इज नॉट वेल लदाख असे म्हणत लक्ष घालण्यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनी पाच दिवसांच्या लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. सोनम वांगचूक कोण आहेत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर प्रख्यात अभिनेता आमीर खान यांनी थ्री इडीएट चित्रपटात त्यांचे फूनसुख वांगडू हे कॅरेक्टर साकारले होते.

प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी येत्या प्रजासत्ताक दिनी पाच दिवस ‘खर्दुगला पास’ येथे उपोषणाचा इशारा दिला आहे. अलीकडे केंद्राने जम्मू कश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे  कलम 370  रद्द करून लडाख आणि कश्मीर दोन केंद्रशासित प्रदेश जरी केले असले तरी पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय प्रतिकूल आणि संवेदनशील असलेल्या लडाखमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे जो उत्तरेकडील काराकोरम पर्वत आणि दक्षिणेकडील हिमालय पर्वतांच्या दरम्यान आहे. हा भारतातील विरळ लोकसंख्या असलेल्या भागांपैकी एक आहे.

वांगlचुक यांनी 13 मिनिटांचा व्हीडीओ पोस्ट करीत,’ लडाखला गंभीर चिंतेचा सामना करावा लागत आहे, एकूणच आर्थिक विकास आणि लडाखच्या विकास वेगाने करण्यासाठी केंद्र सरकारने जरी निर्णय घेतले असले तरी लडाखकडे केंद्राने दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांना लडाखकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. खाणकाम आणि इतर विकास कामांमुळे हिमखडक वितळू शकतात आणि येथील पिण्याच्या पाण्याच्या मर्यादीत स्त्रोतावर परिणाम होईल असा सावधानतेचा इशारा त्यांना दिला आहे. लडाख भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे आणि कारगिल आणि इतर युद्धांमध्ये येथील नागरीकांनी आपले योगदान दिले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.’

वांगचुक यांनी 2020 च्या लडाख हिल कौन्सिलच्या निवडणुकीत भाजपचा झालेला विजय आणि 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्याबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत, ज्यामुळे लडाख आणि जम्मू आणि काश्मीर हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश बनले. त्यांनी लडाखला संरक्षण देण्याची पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागणी करीत केंद्रशासित प्रदेशाबाबत चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले.