भारताला तोडणाऱ्यांसाठी भारत जोडो यात्रा स्थगित..भाजपने काय केला वार..

| Updated on: Sep 23, 2022 | 6:56 PM

दिल्लीतील भाजप नेते कपिल मिश्रा यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील कारवाईचा संबंध थेट 'भारत जोडो' यात्रेबरोबर जोडला आहे

भारताला तोडणाऱ्यांसाठी भारत जोडो यात्रा स्थगित..भाजपने काय केला वार..
Follow us on

नवी दिल्लीः काँग्रेसन आपल्या अस्तित्वाची लढाई ओळखल्यानेच काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेला (Bharat jodo Yatra) प्रारंभ केला. दक्षिण भारतात या यात्रेला उत्स्फुर्त पाठिंबा मिळत असतानाच मात्र भाजपकडून राहुल गांधी आणि काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल चढविला आहे. या यात्रेच्या निमित्ताने एकीकडे काँग्रेस केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवत आहे, तर दुसरीकडे भाजपकडूनही भारत जोडो यात्रेवर जोरदार हल्लाबोल होत आहे.

 

आता दिल्लीतील भाजप नेते कपिल मिश्रा यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील कारवाईचा संबंध थेट ‘भारत जोडो’ यात्रेबरोबर जोडला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये एकीकडे पीएफआयने आंदोलन केले आहे तर दुसरीकडे काँग्रेसने आपली पदयात्रा थांबवल्याचा आरोप केला आहे.

कपिल मिश्रा यांनी ट्विट करण्याआधीच खरं तर काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून भारत जोडो यात्रा आज विश्रांती घेणार असल्याचे सांगितले होते. तरीही कपिल मिश्रानी आपल्या ट्विटवरुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, PFI और इस्लामिक जिहादी संगठनों ने आज हड़ताल का आह्वान किया और कांग्रेस ने आज अपनी पद यात्रा रोक दी इससे घटिया और शर्मनाक कुछ नहीं हो सकता असंही त्यांनी ट्विट केले आहे.

या ट्विटनंतर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी त्यांना प्रतिक्रियाही दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘आमच्या या भारत जोडी यात्रेच्या प्रवासात दर आठवड्याला एक दिवस हा विश्रांतीचा असतो.

त्यामुळे शेवटचा ब्रेक हा 15 तारखेला होता. त्यामुळे आता मला सांगा, मोहनजी भागवत पीएफआयची माफी मागण्यासाठी प्रवासाला निघणार आहेत हे खरे आहे का? असा टोलाही त्यांनी आपल्या ट्विटमधून लगावला आहे.

एनआयएकडूनच्या देशातील दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपाखाली गुरुवारी 15 राज्यांमध्ये 93 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले होते.

त्यामध्ये 106 पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली गेली. या कारवाईत केरळमधीलही काही ठिकाणी छापे टाकून 22 अटक करुन ताब्यात घेतले गेले आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये केरळ युनिटचे अध्यक्ष सीपी मोहम्मद बशीर, राष्ट्रीय अध्यक्ष सलाम, राष्ट्रीय सचिव नसरुद्दीन, माजी अध्यक्ष ई अबुबकर आणि इतरांचाही समावेश आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांच्यावर आरोप केला गेला की, हा व्यापाकी वर्गावर आर्थिक हल्ला होता. त्यांच्या मुळे देशातील अनेक व्यापार संपुष्टात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटाबंदीमुळेच छोटे आणि मध्यम उद्योगांवरही गंभीर परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. .

काँग्रेस नेते गांधी भारत जोडो यात्रेनिमित्त त्रिशूर जिल्ह्यातील चालकुडीमध्ये जाहीर सभेत संबोधित करत होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते आजच्या दौऱ्यावेळी उपस्थित होते.

7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही काँग्रेसची पदयात्रा 3 हजार 570 किमी आणि 150 दिवसांची ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन थांबणार आहे.