काँग्रेसमध्ये पुन्हा रिमोट राज येणार; भाजपने अध्यक्षपदावरुन उडवली खिल्ली

| Updated on: Sep 23, 2022 | 6:06 PM

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत असली तरी काँग्रेसध्यक्ष पद हे कोण चालवणार हे साऱ्या जगाला माहितीच आहे अशी टीका भाजपने केली आहे.

काँग्रेसमध्ये पुन्हा रिमोट राज येणार; भाजपने अध्यक्षपदावरुन उडवली खिल्ली
Follow us on

नवी दिल्लीः अशोक गेहलोत, शशी थरुर, दिग्विजय सिंह यांच्या नावामुळे कांग्रेस अध्यक्ष (Congress President) पदाची निवडणूक (Election 2022) बहुचर्चित झालेली असतानाच भाजपने मात्र काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. काँग्रेस अध्यक्ष पदावरुन भारतीय जनता पक्षाने टीका टिप्पणी करताना गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष झाला असला तरी होणारा अध्यक्ष हा गांधी घराण्याचे प्रतिनिधित्व करेल अशा शब्दात खिल्ली उडवली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे रिमोट कंट्रोलनुसारच हे पद चालवले जाईल अशी टीकाही त्यांनी केली आहे.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विधानाचा हवाला देत काँग्रेसवर निशाणा साधला.

अशोक गेहलोत यांचा उत्तराधिकारी म्हणून राजस्थान सरकारचे नेतृत्व करण्याबाबतही सध्याच्या अध्यक्षा सोनिया गांधीच निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदाचा रिमोट कंट्रोल हा गांधी घराण्याच्याच हातात राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीची ही नाटकं काँग्रेस का करत आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

गेहलोत यांनी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर शशी थरुरांनीही सोनिया गांधींना भेटून आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. त्यामुळे गेहलोतांकडून थरुरांना थेट आव्हान देण्याची तयारी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेचा संदर्भ देत पूनावाला यांनी सांगितले की, सोनिया गांधी माजी अध्यक्ष असल्याने याबाबत निर्णय कोणत्या क्षमतेने घेतील? हा निर्णय आता आमदारांनीच घ्यावा असं वाटत नाही का असं असा सवाल केला.

त्यामुळे ही निवडणूक होत असली तरी काँग्रेसचा रिमोट कंट्रोल हा गांधी घराण्याच्याच हातात राहणार आहे. त्यामुळे ही निवडणुकीची नाटकं कशासाठी अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेस अध्यक्ष पदावरुन बोलताना भाजपच्या प्रवक्त्यांनी पी. चिंदबरम यांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, पी चिदंबरम यांनी काही दिवसापूर्वीच सांगितले होते की, काँग्रेसचा अध्यक्ष कोणीही झाला तरी पक्षाच्या प्रमुख पदावर मात्र राहुल गांधीच कायम राहतील या वक्तव्याची भाजपकडूनही आठवण करुन दिली आहे.

तर पूनावाला यांनी काँग्रेसवर आरोप करताना म्हटले आहे की, ‘काँग्रेसचे नवे अध्यक्ष गांधी घराण्याचे ‘प्रॉक्सी’ असणार आहेत. मनमोहन सिंग यांच्याप्रमाणेच नव्या अध्यक्षालाही गांधी घराणे रिमोटवर चालवतील अशी टीका केली गेली आहे.