दिल्लीपासून हिमाचलपर्यंत चीनची हेरगिरी, दोन महिलांना अटक, चीनचा मोठा कट लावला उधळून

| Updated on: Oct 28, 2022 | 5:05 PM

दोन हेरगिरी करणाऱ्या महिलांचे टार्गेट तिबेटी लोक होते ही गोष्टही स्पष्ट करण्यात आली आहे

दिल्लीपासून हिमाचलपर्यंत चीनची हेरगिरी, दोन महिलांना अटक, चीनचा मोठा कट लावला उधळून
Follow us on

नवी दिल्लीः भारताच्या सीमालगतच्या भागातून शेजारील राष्ट्रांकडून कुरापती वाढल्या असल्याचे प्रकरण दोन चिनी महिलांच्या हेरगिरीमुळे आता उघडकीस आले आहे. गुप्तहेरगिरी करताना आधी एका महिलेला दिल्लीतून आणि नंतर हिमाचल प्रदेशातील मंडी येथून करण्यात अटकेमुळे एका मोठ्या कटाचा भाग उघड झाल्याचेही तपास यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीदरम्यान भारताला धोकादायक असणारे हेतू त्यांचे उघड झाले आहेत. ज्या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्या दोन हेरगिरी करणाऱ्या महिलांचे टार्गेट तिबेटी लोक होते ही गोष्टही स्पष्ट करण्यात आली आहे. खोटा प्रचार करणे आणि पैशाच्या जोरावर चीनच्या बाजूने ब्रेनवॉश करणे हा त्यांचा हेतू असल्याचे आता उघड झाले आहे.

किंबहुना, या दोन चिनी महिला हेरांच्या माध्यमातून चीन भारतातील पुढील दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी नियुक्त होण्यापूर्वी येथील बौद्ध मठांमध्ये खोटेपणाचा प्रचार करण्यात येत होता.

हिमाचल आणि दिल्लीतून हेरगिरी करणाऱ्या अटक करण्यात आलेल्या चिनी महिलांच्या चौकशीत आणखी महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.

नवीन दलाई लामा यांच्या नियुक्तीमध्ये चीनला स्वतःचा हस्तक्षेप हवा आहे. तर पुढील दलाई लामा हे चीन किंवा प्रो चायना असावेत हा ड्रॅगनचा उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळेच दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात स्थायिक झालेल्या तिबेटी समाजातील लोकांचे ब्रेनवॉश करण्यात चीन गुंतला आहे. ज्यासाठी तो या हेरगिरी करणाऱ्या महिलांचा काही काळ वापर करण्यात येत होता.

दिल्लीतून अटक करण्यात आलेली ही चिनी वंशाची महिला हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथेही बराच काळ वास्तव्यास असल्याचे स्पेशल सेलच्या चौकशीत समोर आले आहे. हेरगिरी करणाऱ्या या चिनी महिलांचा दावा आहे की त्या बौद्ध धर्माचे शिक्षण घेण्यासाठी भारतात आल्या होत्या.

ही महिला दिल्लीमार्गे काठमांडूला जाण्याचा प्रयत्न करत होती, त्यापूर्वी तिला मजनूच्या टिळा परिसरातून अटक करण्यात आली होती. महिलेचा मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट दोन्ही फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अटक करण्यात आलेल्या चिनी वंशाच्या महिला गुप्तहेराने पोलिसांना सांगितले की, ही महिला सप्टेंबरमध्ये चौतारा येथील प्रसिद्ध जोंगसर मठ तिबेटी मठात पूजा करण्याच्या बहाण्याने आली होती.

त्यावेळी त्यांनी 24 दिवस चौंतरा येथे तळ ठोकला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 6.50 लाख रुपयांचे भारतीय चलन आणि 1.10 लाख रुपये किंमतीचे नेपाळी चलन आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. त्यामुळे आता हे साहित्य सगळे तपासासाठी पाठवण्यात आले आहे.

या महिलेकडे दोन पासपोर्ट असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली असून, ही महिला चीनची असली तरी नेपाळमधून बनावट पासपोर्टद्वारे भारतात घुसखोरी केल्याचे सांगण्यात आले आहे. आयबीसह देशातील अनेक केंद्रीय यंत्रणांनी या दोन्ही महिलांची चौकशी आता सुरू केली आहे.