Digital Payments : यूपीआय अॅपवरचे व्यवहार होणार महाग? आरबीआयनं काय तयारी केलीय? वाचा…

| Updated on: Dec 08, 2021 | 12:27 PM

शक्तिकांत दास यांनी व्याजदर स्थिर (Interest Rate) ठेवण्याची घोषणा केली. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिजिटल पेमेंटविषयी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत एक पत्रक जारी करेल. यावरून हे स्पष्ट झालंय, की येत्या काळात आपल्या सर्वांना डिजिटल पेमेंटच्या बदल्यात अतिरिक्त शुल्क भरावं लागणाराय.

Digital Payments : यूपीआय अॅपवरचे व्यवहार होणार महाग? आरबीआयनं काय तयारी केलीय? वाचा...
Follow us on

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Rbi Governor Shaktikanta Das) यांनी बुधवारी चलनविषयक धोरण समितीचे (MPC) चौथे द्विमासिक चलनविषयक धोरण सादर केले. यावेळी शक्तिकांत दास यांनी व्याजदर स्थिर (Interest Rate) ठेवण्याची घोषणा केली. रेपो दर (repo rate) 4 टक्के, रिव्हर्स रेपो दर (reverse repo rate) 3.35 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आलाय. एमपीसीनं आपली अनुकूल भूमिका कायम ठेवलीय. गेल्या वर्षी मार्चमध्ये (वर्ष 2020) आरबीआय(RBI)नं रेपो दरात 0.75 टक्के आणि मेमध्ये 0.40 टक्के कपात केली होती. या कपातीनंतर रेपो दर ४ टक्क्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर आला होता.

डिजिटल पेमेंट महाग असू शकते
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिजिटल पेमेंटविषयी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत एक पत्रक जारी करेल. यावरून हे स्पष्ट झालंय, की येत्या काळात आपल्या सर्वांना डिजिटल पेमेंटच्या बदल्यात अतिरिक्त शुल्क भरावं लागणाराय. RBIदेखील UPI आधारित फीचर फोन उत्पादनं लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे गव्हर्नर म्हणाले.

डिजिटल पेमेंटमध्ये देशात झपाट्यानं वाढ
2016मध्ये नोटाबंदीनंतर भारतात डिजिटल पेमेंट (Digital Payments) झपाट्यानं वाढलं. कोरोना (Corona) विषाणूच्या महामारीच्या काळात देशातील डिजिटल पेमेंटचा आलेख उच्च पातळीवर पोहोचला. संसर्ग टाळण्यासाठी लोक डिजिटल पेमेंटवर अवलंबून होते. त्यामुळे देशात होत असलेल्या डिजिटल पेमेंटचा वेग सातत्यानं वाढतोय.

काय सांगतो अहवाल?
एका अहवालानुसार, गुगल पे (Google Pay), पेटीएम (Paytm), फोन-पे (Phone-Pe) आणि भीम अॅप (BHIM App) यासारख्या इतर यूपीआय (UPI) प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला सुमारे 1.22 अब्ज म्हणजेच सुमारे 122 कोटी रुपयांचे व्यवहार होऊ लागले आहेत. दुसरीकडे, जर आपण 2016मधली म्हणजेच 5 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीची तुलना केली तर आता त्यात 550% वाढ झालीय. 2016-17मध्ये 1, 004 कोटी डिजिटल व्यवहार झाले. 2020-2021मध्ये हा आकडा 5, 554 कोटींवर पोहोचला. 2020च्या तुलनेत एप्रिल-मे 2021मध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये 100%पेक्षा जास्त वाढ झालीय.

काय आहे UPI?
UPI, ज्याला आपण इंग्रजीत युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणतो, ही डिजिटल पेमेंट पद्धत आहे, जी मोबाइल अॅपद्वारे कार्य करते. या अॅपद्वारे तुम्ही सुरक्षित पद्धतीने पेमेंट करू शकता. पैसे अडकले तरी बँक खात्यात ते परत मिळतात. तुम्ही UPIद्वारे बिले भरू शकता, ऑनलाइन फंड ट्रान्सफर करू शकता आणि नातेवाईक किंवा मित्रांना पैसे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइलमध्ये अॅप डाऊनलोड करावे लागेल. यासाठी मोबाइल नंबर बँक खात्याशी जोडलेला असायला हवा.

RBI: EMIमध्ये दिलासा नाही, व्याज दरातही बदल नाही, शक्तिकांत दास म्हणाले, अर्थव्यवस्था रुळावर येतेय

एक खाते अनेक फायदे; जाणून घ्या पीपीएफ खात्यामधील गुंतवणुकीचे फायदे

सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स, टाटा, प्रेमजी यांच्यात अव्वल कोण? पाहा संपूर्ण यादी